कठुआच्या आरोपींना पाठिंबा देणाऱ्या भाजप मंत्र्यांचा राजीनामा

कठुआच्या आरोपींना पाठिंबा देणाऱ्या भाजप मंत्र्यांचा राजीनामा

या आरोपींच्या समर्थानार्थ कठुआत हिंदु एकता मंचने मोर्चा काढला होता. या मोर्च्यातच हे दोन आमदार सहभागी झाले होते

  • Share this:

12 एप्रिल:   जम्मूतील कठुआ बलात्कार प्रकरणातील  आरोपींच्या समर्थनार्थ  काढण्यात आलेल्या मोर्च्यात सहभागी झालेल्या  भाजपच्या दोन्ही राज्य सरकारातील मंत्र्यांनी आज राजीनामा दिला आहे.चंद्रप्रकाश गंगी आणि चौधरी लाल सिंह या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिलाय.

जानेवारी 2018 महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात  कठुआ इथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करून तिचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला होता. ही घटना कठुआतील एका मंदिरात घडली होती. याप्रकरणात अपहरण झाल्यावर मुलीच्या आई वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. यात तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यानेही पीडितेवर बलात्कार केला. अनेक दिवसाच्या दिरंगाई नंतर अखेर एप्रिल महिन्यात पोलिसांनी चार्जशीट काश्मिरच्या हायकोर्टात दाखल केली.

यातील आरोपींच्या समर्थानार्थ कठुआत  हिंदु एकता मंचने मोर्चा काढला होता. या मोर्च्यातच हे मंत्री सहभागी झाले होते. त्यात "भारत माता की जय" अशा घोषणाही देण्यात आल्या होत्या.  याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई होईल असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. या वक्तव्यानंतर या दोन मंत्र्यानी राजीनामा दिलाय.

आता या प्रकरणी आरोपींना शिक्षा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2018 09:04 PM IST

ताज्या बातम्या