मोदी सरकारमधील मंत्र्यांची होणार धावपळ; अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने लागण होण्याची भीती

मोदी सरकारमधील मंत्र्यांची होणार धावपळ; अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने लागण होण्याची भीती

अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली असून पाच दिवसांपूर्वी ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले होते

  • Share this:

नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : देशाचे गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. कोरोना चाचणीनंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात धावपळ सुरू झाली आहे. अमित शहांनी चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक मंत्री होम क्वारंटाईन होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृह मंत्रालयातील अनेक जेष्ठ अधिकारी देखील होम क्वारंटाईन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. यामध्ये अमित शहांसह अनेक मंत्री सहभागी झाले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात अमित शहा यांना कोरोणाची लक्षणं आढळून आली आहेत. पाच दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली होती.

हे वाचा-BREAKING : गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णालयात हलवलं

यामध्ये अमित शहा उपस्थित होते. यामुळे आता इतर मंत्र्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार असून त्यांची तातडीने चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेकांनी ट्विट करुन अमित शहा यांची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली.

Published by: Meenal Gangurde
First published: August 2, 2020, 5:38 PM IST

ताज्या बातम्या