लखनऊ,ता.16 नोव्हेंबर : केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांना आज रेल्वे विभागाच्याच कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केली. एका कर्मचाऱ्यांने त्यांच्या दिशेने कुंडीही फेकून मारली त्यातून ते थोडक्यात बचावले. मात्र यात त्याचा सरक्षा कर्मचारी जखमी झाला. कर्मचाऱ्यांच्या या कृतीमुळं रेल्वेमंत्र्यांना कार्यक्रमातून काढता पाय घ्यावा लागला. उत्तर रेल्वेच्या 70 व्या वार्षिक सभेत ते उपस्थित होते. कमगार संघटना या कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत असल्याचं सांगताच कर्मचारी भडकले आणि त्यांनी गोंधळ घातला.