कर्नाटक, 15 जानेवारी : नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. धारवाड राष्ट्रीय महामार्गावर (Dharwad National Highway) मिनी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 11 जण जागीच ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर आणखी काही प्रवासी जखमी झाले आहे. जखमींना तातडीने धारवड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ही घटना घडली. दावणगिरीहुन काही पर्यटक हे गोव्याला मिनी बसने जात होते. पहाटे धारवाड महामार्गावर मिनीबस आणि ट्रकची जोरदार धडक झाली.
मेंदूतही घुसतोय कोरोना; फु्फ्फुसांतील संसर्गापेक्षाही गंभीर अवस्था
हा अपघात इतका भीषण होता की, यात मिनी बसचा चुराडा झाला आहे. या अपघातात अपघातात 11 जण जागीच ठार झाले आहे. घटनास्थळावर मृत प्रवाशांचा एकच आक्रोश मन सुन्न करणारा होता.
नोकरी मिळाली नाही म्हणून उच्चशिक्षित बहिण-भावांनी काढली बोगस कंपनी!
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने धारवाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.