बैठकीवरून रणकंदन, पंतप्रधान मोदींवर भडकले असदुद्दीन ओवेसी

बैठकीवरून रणकंदन, पंतप्रधान मोदींवर भडकले असदुद्दीन ओवेसी

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 तारखेला देशातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अनेक देशांना हादरवून सोडलं आहे. भारतातही कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून ही स्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 तारखेला देशातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे ही बैठक होणार आहे.

नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या या बैठकीसाठी एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांना बोलावण्यात आलेले नाही. यावरून ओवेसी भडकले आहेत. हैदराबादमधून ओवेसी हे खासदार आहेत. तर महाराष्ट्रातील औरंगाबादमधून इम्तियाज जलील हे एमआयएमचे खासदार आहेत. यामुळे बैठकीला न बोलावून पंतप्रधान मोदींनी हैदराबाद आणि औरंगाबादच्या नागरिकांचा अपमान केला आहे, असं ओवेसी म्हणाले.

दरम्यान, एकीकडे हे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना सर्व मंत्री, सर्व खासदारांनी पुढच्या 1 वर्षासाठी 30% पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि अनेक राज्यपालांनी त्यांचे पगार 30 टक्के न घेण्याचे ठरविले आहे. याबाबत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना लिहिले पत्र

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्यांसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पर्यावरण मंत्रालयाने नॅशनल पार्क, अभयारण्य आणि टायगर रिझर्व्ह विषयी सूचना जारी केल्यात. सर्व राज्यांना वन्य प्राण्यांबाबत त्वरित काही पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे. अमेरिकेत वाघामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर देशातील सर्व राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पाला भेटी देण्यासाठी पूर्ण बंदी करण्यात आली आहे .

First published: April 6, 2020, 4:07 PM IST

ताज्या बातम्या