• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • महालक्ष्मी मंदिरात कुबेरच्या खजिन्याची सजावट पूर्ण; देवीसमोर कोट्यवधी रुपयांचा ढीग, पाहा VIDEO

महालक्ष्मी मंदिरात कुबेरच्या खजिन्याची सजावट पूर्ण; देवीसमोर कोट्यवधी रुपयांचा ढीग, पाहा VIDEO

Mahalxmi Temple Decoration Video: दिपावली सणाच्या तोंडावर रतलाम येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात (Mahalxmi temple Ratlam) कुबेरच्या खजिन्याची सजावट (Decoration) पूर्ण झाली आहे.

 • Share this:
  रतलाम, 02 नोव्हेंबर: दिपावली सणाच्या तोंडावर रतलाम येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात (Mahalxmi temple Ratlam) कुबेरच्या खजिन्याची सजावट (Decoration) पूर्ण झाली आहे. यावेळी देखील भाविकांनी लाखों रुपयांची रोकड, सोने-चांदीच्या अंगठ्या आणि दागिने देवीच्या सजावटीसाठी भेट दिल्या आहेत. दरवर्षी दिपावली सणाच्या आधी अनेक भाविक रोकडं आणि सोन्या चांदीचे दागिने या मंदिरात भेट देतात. याच दागिन्यांचा आणि पैशांचा वापर करत महालक्ष्मीची सजावट केली जाते. यालाच कुबेरचा खजिना असं म्हटलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. यावेळी मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. पण मंदिराच्या बाहेरून भाविकांना महालक्ष्मीचं दर्शन घेता येणार आहे. मध्य प्रदेशातील रतलाम येथील माणक चौक परिसरात महालक्ष्मीचं हे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कुबेरच्या खजिन्याची सजावट करण्यात आली आहे. या मंदिरात केवळ मध्य प्रदेशातील नाही तर देशभरातील लाखो भाविक दिवाळी सणाच्या आधी दागिने आणि रोकड भेट देतात. हेही वाचा-दिवाळीआधी देशात घातपाताचं संकट; 46 रेल्वेस्थानकं बॉम्बने उडवण्याची धमकी काहीजण नोटांचे बंडल देतात, तर काहीजण सोन्या-चांदीचे दागिने देवीला भेट देतात. मंदिरात जमा केलेल्या या दागिने आणि रोकडचा वापर करून या मंदिराची सजावट पूर्ण केली जाते. ही सजावट दिवाळी सणाच्या दरम्यान पाच दिवस ठेवली जाते. विशेष म्हणजे कोणत्या भाविकाने कोणती भेटवस्तू दिली? याची रजिस्टरमध्ये फोटोसहीत नोंद केली जाते. पाच दिवसांनंतर रजिस्टरमधील नोंदीनुसार, सर्व रक्कम आणि दागिने प्रसाद म्हणून भाविकांना परत दिली जाते. ही परंपरा कुबेरचा खजिना नावाने देशभरात प्रसिद्ध आहे. रतलामच्या महालक्ष्मी मंदिरात दागिने आणि रोकड भेट देण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. यावर्षी देखील भाविकांनी कोट्यवधी रुपयांची रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने देवीला भेटीच्या रुपात दिले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने या खजिन्यावर लक्ष ठेवलं जात आहे. कुबेरच्या खजिन्याची सजावट केलेला एका व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. देवीसमोर कोट्यवधीं रुपयांचा ढीग पडला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: