Home /News /national /

कोट्यधीश स्वीपरने 10 वर्षांपासून काढला नाही पगार; बँकेचे अधिकारी कार्यालयात आल्यानंतर बिंग फुटलं

कोट्यधीश स्वीपरने 10 वर्षांपासून काढला नाही पगार; बँकेचे अधिकारी कार्यालयात आल्यानंतर बिंग फुटलं

सरकारच्या कुष्ठ रोग विभाग कार्यालयात ही व्यक्ती काम करते.

    लखनऊ, 25 जून : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) प्रयागराजमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील सीएमओ ऑफिसातील कुष्ठ रोग विभागातील एक स्वीपर कोट्यवधी असल्याचं समोर आलं आहे. सध्या त्याच्या खात्यात 70 लाख रुपये आहेत. याशिवाय जमीन, मोठं घरदेखील आहे. हे वाचून कदाचित तुम्हाला खोटं वाटेल. मात्र हे सत्य आहे. गेल्या 10 वर्षांपासून त्याने बँकेतून आपला पगार काढलाच नाही. आता बँक कर्मचारी खात्यातून सॅलरी काढण्याची विनंती करीत आहे. त्यामुळे हा स्वीपर आपला घरखर्च कसा करीत होता, असा सवाल उपस्थित होत आहे. कपडे पाहून लोक समजत होते भिकारी... धीरज नावाची ही व्यक्ती घाणेरडे कपडे घालून सीएमओ ऑफिसच्या जवळच्या लोकांकडून पैसे मागत असेल. त्याला भिकारी समजून लोक पैसेही देत होते. मात्र हा भिकारी नव्हता तर कुष्ठ रोग विभागात स्वीपर आणि तो कोट्यवधी आहे. बँकेचे अधिकारी याला शोधत शोधत जेव्हा कुष्ठ रोग विभागात आले, तेव्हा याबाबत खुलासा झाला. गेल्या 10 वर्षांपासून याने आपला पगारच काढला नाही. पैसेच काढले नाही... धीरजचे वडील या विभागाच्या स्विपर पदावर कार्यरत होते. नोकरीदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर 2012 मध्ये त्यांचा मुलगा या पदावर नोकरी करू लागला. तेव्हापासून त्याने बँकेतून आपला पगारच काढला नाही. तो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पैसे मागून खर्च चालवत होता. याशिवाय त्याच्या आईची पेन्शनही येत होती. विशेष म्हणजे धीरज सरकारला इन्कम टॅक्सही देतो. कोट्यवधी धीरज आपली आई आणि बहिणीसोबत राहतो. त्याचं अद्याप लग्न झालेलं नाही. त्याला लग्न करण्याची इच्छाही नाही. कोणी त्याचे पैसे घेऊन जाईल या भीतीने तो लग्नही करीत नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Money, Uttar pradesh

    पुढील बातम्या