करोडपती व्यापाऱ्याचा हरवलेला मुलगा हॉटेलमध्ये भांडी घासताना सापडला; पोलिसांनी उलगडली कहाणी

करोडपती व्यापाऱ्याचा हरवलेला मुलगा हॉटेलमध्ये भांडी घासताना सापडला; पोलिसांनी उलगडली कहाणी

गुजरातमधल्या एका मोठ्या व्यापाऱ्याचा मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या कोट्यधीश व्यावसायिकाचा मुलगा शिमल्यामध्ये एका हॉटेलात भांडी घासायचं काम करत होता, असं पोलीस तपासात निष्पन्न झालं.

  • Share this:

वडोदरा, 6 नोव्हेंबर : गुजरातमधल्या एका मोठ्या व्यापाऱ्याचा मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या कोट्यधीश व्यावसायिकाचा मुलगा शिमल्यामध्ये एका हॉटेलात भांडी घासायचं काम करत होता, असं पोलीस तपासात निष्पन्न झालं. 19 वर्षांच्या गर्भश्रीमंत मुलाने हॉटेलातली खरकटी भांडी धुवायचं काम का स्वीकारलं हे पोलिसांकडूनच समजलं.

गुजरातच्या बडोदा जिल्ह्यात पाडरा भागातल्या मोठ्या तेल व्यापाऱ्याच्या मुलाची ही कहाणी आहे. 19 वर्षांचा द्वारकेश ठक्कर वसाड इथे कॉलेजमध्ये शिकत होता. 14 ऑक्टोबरला कॉलेज सुटल्यावर तो घरीच आला नाही. घरी आई-वडील काळजीत पडले. मित्रांना विचारून झालं. मग थेट पोलीस स्टेशन गाठण्यात आलं. पोलिसांच्या तपासा असं निष्पन्न झालं की, द्वारकेश वडोदरा स्टेशनवर शेवटचा दिसला होता. तो तिथून कुठल्या तरी ट्रेनमध्ये बसून गेल्याचं तपासात पुढे आलं.

वाचा - पुण्यात हॉटेलच्या लेडीज वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा.. मुलींचे केले चित्रिकरण

अखेर एक दिवस शिमल्याच्या एका हॉटेल मॅनेजरचा फोन गावातल्या पोलीस स्टेशनला पोहोचला आणि द्वारकेशचा पत्ता लागला. आपल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका मुलाची बॅकग्राउंड चेक करण्यासाठी फोन करत असल्याचं मॅनेजरने सांगितलं. पाडरा पोलिसांनी त्या मॅनेजरकडे मुलाचा फोटो मागितला. तो फोटो बघताच द्वारकेश शिमल्यात असल्याचं लक्षात आलं.

वाचा - VIDEO : KBC मध्ये पोहोचला चहावाल्याचा मुलगा, कहाणी ऐकून भारावले बिग बी!

स्वतःला सिद्ध करण्यासाठी द्वारकेश घरातून निघून गेला आणि त्यानं मिळेल ते काम पत्करलं. गुजरातमधून निघून थेट हिमाचल प्रदेशात शिमल्याला तो पोहोचला. ही माहिती कळताच पोलिसांनी द्वारकेश ठक्करच्या आई-वडील आणि नातेवाईकांना याविषयी कळवलं. आपल्या मुलाचा पत्ता लागताच त्याचे आप्त थेट शिमल्यात पोहोचले. हॉटेलमध्ये भांडी घासत असलेला मुलगा पाहून त्यांच्याही डोळ्यात अश्रू आले.

--------------------

VIDEO : शरद पवारांचा अमित शाहांना मिश्कील टोला, उपस्थितांमध्ये पिकला हशा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2019 04:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading