जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलानं हाणून पाडला

जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलानं हाणून पाडला

निया सेक्टर जवळच्या सीमेवरून पाकिस्तानच्या बाजूनं एक भुयार खोदण्यात येत होतं. 14 फुट खोल हे भुयार खोदण्यात आलं होतं. दरम्यान सीमा सुरक्षा दलाला काही सशस्त्र लोक संशयास्पद हालचाली करताना आढळले होते.

  • Share this:

श्रीनगर,01 ऑक्टोबर: जम्मू काश्मीरमध्ये सीमेवरून घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न सुरक्षा दलानं हाणून पाडलाय. अरनिया भागात पाकिस्तान हा प्रयत्न करत होता.

अरनिया सेक्टर जवळच्या सीमेवरून पाकिस्तानच्या बाजूनं एक भुयार खोदण्यात येत होतं. 14 फुट खोल हे भुयार खोदण्यात आलं होतं. दरम्यान सीमा सुरक्षा दलाला काही सशस्त्र लोक संशयास्पद हालचाली करताना आढळले होते. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार करताच ते लोक पसार झाले. त्या संशयास्पद लोकांची जंगलात शोधमोहिम राबवण्यात आली. त्या शोधमोहिमेत या भुयाराचा शोध लागला आणि मग सुरक्षा दलाने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी हा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात येत होता त्याच्याबरोबर एक दिवस आधी भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन काश्मीर दौऱ्यावर होत्या. त्यातही त्यांनी काश्मीर दौऱ्यावर घुसखोरी विरोधी कामांचीच माहिती सेनेच्या अधिकाऱ्यांकडून घेतली होती. सणांच्या दिवशी देशाला हेलावून सोडण्याचा शत्रूचा कट असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

First published: October 1, 2017, 10:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading