लेकराच्या मृत्यूचा मानसिक धक्का! 3 वर्षांच्या मुलावर अंत्यंसस्कारानंतर जवानाने पत्नीसह केली आत्महत्या

लेकराच्या मृत्यूचा मानसिक धक्का! 3 वर्षांच्या मुलावर अंत्यंसस्कारानंतर जवानाने पत्नीसह केली आत्महत्या

नायब सुभेदाराने 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर घरी येऊन पत्नीसह आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे.

  • Share this:

जबलपूर, 24 एप्रिल : कोरोना व्हायरसने थैमान घातलं असतानाच गुरुवारी जम्मू काश्मीरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रायफल रेजिमेंटमधील नायब सुभेदार पदावर तैनात असलेल्या जवानाने पत्नीसह आत्महत्या केली आहे. शहरातील केंट ठाण्याच्या हद्दीत आर्मी परिसरात या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गुरुवारी सकाळी दाम्पत्याच्या 3 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. त्याच्या धक्क्यामुळेच दोघांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.

एएसपी संजीव यांनी सांगितलं की, सुभेदार जितेंद्रच्या तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. तो बऱ्याच दिवसांपासून आजारी होता. मुलाच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करून सुभेदार घरी परतला होता. त्यानंतर दुपारच्या दरम्यान शेजाऱ्यांनी त्यांच्या घरी जेवणही पोहोचवलं. मात्र, सायंकाळी जेव्हा लोक त्यांना भेटण्यासाठी गेले तर दरवाजा उघडला नाही.

लोकांनी दरवाजा बराच वेळ ठोठावल्यानंतरही सर्वांच्या मनात शंका आली. त्यानंतर दरवाजा तोडून घरात प्रवेश करताच समोर धक्कादायक असं दृश्य दिसलं. पती पत्नीने स्वत:ला फासावर लटकावून घेतलं होतं अशी माहिती एएसपी संजीव यांनी दिली.

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या मृत्यूनंतर पती-पत्नीला धक्का बसला होता. दोघेही कोणाशी बोलत नव्हते. याच धक्क्यातून त्यांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून घटनेची माहिती कुटुंबियांना दिली आहे.

हे वाचा : कोरोनामुळं घरच्यांनी सोडली साथ! स्मशानाबाहेर एक तास मृतदेह राहिला पडून अखेर...

जितेंद्र यांना गेल्या पाच वर्षात दुसऱ्यांदा पुत्रवियोगाचा धक्का बसला होता. 2015 मध्ये त्यांच्या चार वर्षांच्या मुलाचाही आजारपणामुळे मृत्यू झाला होता. त्या धक्क्यातून सावरलेल्या पती-पत्नीने पुन्हा नविन आयुष्य सुरु केलं होतं. मात्र आता दुसऱ्या मुलाच्या मृत्यूनंतर मात्र ते कोलमडून पडले आणि टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवलं.

हे वाचा : वर्दीसह आईचंही कर्तव्य बजावतेय कोरोना योद्धा, बाळाला कडेवर घेऊन करतेय ड्यूटी

First published: April 24, 2020, 4:00 PM IST
Tags: crime

ताज्या बातम्या