महाराष्ट्रातून सायकलने कामगार निघाला गावी, 350 किमी प्रवास केल्यानंतर मृत्यूनं गाठलं

महाराष्ट्रातून सायकलने कामगार निघाला गावी, 350 किमी प्रवास केल्यानंतर मृत्यूनं गाठलं

लॉकडाऊननंतर परराज्यात अडकलेले कामगार त्यांच्या गावी जाण्यासाठी धडपडत आहेत. यातच ते वेगवेगळ्या मार्गांचाही वापर करून जीव धोक्यात घालत आहेत.

  • Share this:

भोपाल, 02 मे : लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेले प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. काहींनी चालत तर काहींनी सायकलनं गावाकडे प्रवास केला. अनेकांनी ट्रक, टँकर किंवा इतर मार्गांनी जाण्याचा प्रयत्न केला. त्यात काही जणांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक प्रकारही समोर आले आहेत. आता महाराष्ट्रातून सायकलने मध्यप्रदेशात सायकलनं गेलेल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

मध्य प्रदेशातील बडवानी इथं तबरक अन्सारी नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मुळचा उत्तर प्रदेशचा असलेला अन्सारी महाराष्ट्रातील भिवंडी इथून गावाकडे जाण्यासाठी निघाला होता पण वाटेतच त्याच्यावर काळाने घाला घातला. पोलिसांचे म्हणणे आहे की, थकल्यामुळे आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानं अन्सारीचा मृत्यू झाला.

अन्सारीसोबत इतर 10 जण गेले होते. त्यापैकी एकाने सांगितलं की, लॉकाडऊनच्या काळात काम नसल्यानं आणि खाण्याचे हाल होत असल्यानं घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. भिवंडीतून जवळपास 350 किमी अंतर कापल्यानंतर अन्सारी चक्कर येऊन रस्त्यावर पडला. महाराष्ट्राच्या सीमेलगतच मध्यप्रदेशात बडवानी जिल्हा आहे. गेल्या दहा दिवसांत याठिकाणी गावी जाणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचा : देशात कोरोना बाधितांची संख्या गेली 38 हजारांच्या जवळ, 1223 जणांचा मृत्यू

केंद्र सरकारने सर्व राज्यांना आदेश दिले आहेत की परराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेन चालू कऱण्यात येत आहेत. त्यांना पोहोचवण्यासाठी रेल्वेसोबत समन्वय साधून मजुर, पर्यटक, विद्यार्थी यांना त्यांच्या गावी पोहचवण्याची व्यवस्था करावी.  सरकारने लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढवलं आहे. याकाळात रेड झोनमध्ये कडक निर्बंध असतील तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे.

हे वाचा : Lockdown मध्ये लपून भेटणं महागात पडलं, गावकऱ्यांनी थेट बोहल्यावर चढवलं

First published: May 2, 2020, 9:29 PM IST

ताज्या बातम्या