... तर देवेगौडांशी युती करू -सुधीर मुनगंटीवार

... तर देवेगौडांशी युती करू -सुधीर मुनगंटीवार

कर्नाटकमध्ये प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत.12 मेला मतदान होणार आहे तर 15 मे ला निकाल आहेत. ही निवडणूक प्रचंड चर्चेत राहिली.

  • Share this:

10 मे: जर कर्नाटकमध्ये  भाजपला पुरेशा जागा मिळाल्या नाहीत  आणि गरज पडली तर आम्ही देवेगौडांशी युती करू  अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

कर्नाटकमध्ये प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत.12 मेला मतदान होणार आहे तर 15 मे ला निकाल आहेत. ही निवडणूक प्रचंड चर्चेत राहिली. राहुल गांधींनी तसंच देवेगौडांनी आपलं सर्वस्व या निवडणुकीत पणाला लावलं . आता मोदींचा करिश्मा चालतो की सिद्धरमय्यांच्या प्रतिमेला लोक पुन्हा स्विकारतात याची सर्वत्र चर्चा  आहे,

सध्याच्या परिस्थितीत  त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची  शक्यता आहे. अशात भाजप 100 जागांच्या आसपास  गुंडाळली गेली तर जेडीएस  भाजपसोबत सरकार उभारेल असं त्यांनी सांगितलं.  काँग्रेससुद्धा जेडीएसच्या बाहेरून पाठिंबा घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. कर्नाटक निवडणुकांनतर काँग्रेस अजून एक राज्य गमावेल असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2018 09:52 PM IST

ताज्या बातम्या