Home /News /national /

मोठी बातमी! MIG-29 विमान समुद्रात कोसळलं, एका वैमानिकाला वाचवण्यात यश

मोठी बातमी! MIG-29 विमान समुद्रात कोसळलं, एका वैमानिकाला वाचवण्यात यश

एका वैमानिकाला वाचवण्यात हवाई दलाला यश आलं असून दुसऱ्या वैमानिकाचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नौदलाला देखील माहिती देण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : भारतीय नौदलातील मिग-29 MiG-29K Trainer Aircraft विमान शुक्रवारी संध्याकाळी अपघातग्रस्त झाल्याची माहिती मिळाली आहे. हे विमान गुरुवारी संध्याकाळी समुद्रात कोसळलं असून सध्या वैमानिकांचा शोध सुरू आहे. हे विमान प्रशिक्षणासाठी वापरण्यात आल्याची माहिती हवाई दलाकडून देण्यात आली आहे. या विमानातून प्रशिक्षण दिलं जात असताना हा अपघात झाला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एका वैमानिकाला वाचवण्यात हवाई दलाला यश आलं असून दुसऱ्या वैमानिकाचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नौदलाला देखील माहिती देण्यात आली असून वैमानिकाचा शोध घेण्यासाठी हवाई दल आणि नौदलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास प्रशिक्षणादरम्यान मिग-29 विमानाला अपघात झाला. मिग विमानातील एक वैमानिक अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. तर या अपघाताप्रकरणी चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. मिग विमानाचा अपघात होण्याची ही पहिली वेळ नाही तर याआधी देखील अशा प्रकारचे अपघात झाले आहेत. गेल्यावर्षी 16 नोव्हेंबरला मिग -29 विमानाचा अपघात झाला त्यावेळी पायलट सुखरुप वाचवण्यात आले. या घटनेच्या तीन महिन्यांतच दुसरे विमानही अपघाताला बळी पडले.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या