Home /News /national /

Mig 21 Crash मुलाच्या आवडत्या टी शर्टवर वडिलांनी दिली अंतिम सलामी, सुनेला म्हणाले, 'आता तू माझी मुलगी'

Mig 21 Crash मुलाच्या आवडत्या टी शर्टवर वडिलांनी दिली अंतिम सलामी, सुनेला म्हणाले, 'आता तू माझी मुलगी'

Mig 21 Crash Martyr Abhinav Chaudhary अभिनव रोज सायंकाळी फोन करून त्यांना तो ठीक असल्याचं सांगत होता. आता मुलालाच खांदा देण्याची वेळ आली आहे. मला रोज सायंकाळी फोन करून मी ठीक आहे असं कोण सांगणार असं सतेंद्र चौधरी म्हणाले.

    मीरत, 22 मे : भारतीय हवाईदलाचे लढाऊ विमान मिग-21 क्रॅश (Mig 21 Crash) झाल्यानं मीरतचे असलेले स्क्वॉड्रन लीडर अभिनव चौधरी शहीद झाले. त्यांचं पार्थिक घरी आणलं त्यावेळी अत्यंत भावनिक वातावरण पाहायला मिळालं. अभिनव यांचे वडील सत्येंद्र चौधरींनी मुलाला त्याचा आवडता टी शर्ट परिधान करत सलामी दिली. तर अभिवन यांच्या पत्नी आणि आईची अवस्था पाहून अनेकांचे डोळे पाणावले. अभिनव यांची पत्नी सोनिका यादेखिल अभिनव यांच्या मृतदेहाबरोबरच मेरठला आल्या. त्यांना वेगळ्या गाडीतून आणण्यात आलं. सोनिका यांना अभिनव यांच्या निधनाचा प्रचंड धक्का बसला असून त्या खूप रडत आहेत. अभिनव यांची आई आणि बहीण त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर आईचाही भावनेचा बांध फुटला. मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर त्या बेशुद्ध झाल्याचं पाहायला मिळालं. (वाचा-अंदमानात मान्सून दाखल; येत्या 3 दिवसात पुण्यासह 'या' जिल्ह्यांत पाऊस) मुलाचा आवडता टी शर्ट परिधान करून सलामी अभिनव यांच्या वडिलांनी मुलाचा आवडता टी शर्ट परिधान करत त्याला अंतिम सलामी दिली. तो त्याच्या मिलिट्री कॉलेजचा टी शर्ट होता. अभिनवचे वडील रोज सायंकाळी मुलाच्या फोनची वाट पाहत असायचे. अभिनव रोज सायंकाळी फोन करून त्यांना तो ठीक असल्याचं सांगत होता. आता मुलालाच खांदा देण्याची वेळ आली आहे. मला रोज सायंकाळी फोन करून मी ठीक आहे असं कोण सांगणार असं सतेंद्र चौधरी म्हणाले. (वाचा-गाव सोडलेली पोरंच संकटकाळात गावासाठी आली धावून; आरोग्य केंद्राला लाखोंची मदत) आता मला फक्त दोन मुलीच उरल्या सोनिका आणि शहीद अभिनव यांचा संसार फुलण्याआधीच नियतीनं अभिनवला सोनिकापासून दूर नेलं. सोनिका आणि अभिनव यांच्या लग्नाला फक्त 17 महिने झालेले होते. त्यात ते दोघे फक्त नऊ महिने एकत्र राहिले. सोनिका अभिनव यांच्या पार्थिवाबरोबरच मीरतला येत होत्या. त्यावेळी सासरे सुनेशी फोनवर बोलताना रडू लागले. अभिनवला घेऊन लवकर घङरी ये. आता मला फक्त दोन मुलीच उरल्या आहेत. तूही आता कीकूसारखी माझी मुलगीच आहे, असं ते म्हणाले. कीकू म्हणजे अभिनवची छोटी बहीण मुद्रिका. अभिनव आणि सोनिका यांचा विवाह 25 डिसेंबर 2019 ला झाला होता. त्यावेळी सोनिका फ्रान्समध्ये शिकत होता. त्यामुळे लग्नानंतर अभिनव पठानकोट आणि सोनिका परत फ्रान्सला गेली होती. गेल्यावर्षीच सोनिका परतली होती. त्यावेळी अभिनवही सुट्टी घेऊन मीरतला आला होता. त्यानंतर दोघं सोबच सूरतगडला गेले होते. या महिन्यात दोघं परत येणार होते, पण त्याआधीच नियतीनं होत्याचं नव्हतं केलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Accident, Airplane, Punjab, Uttar pardesh, Uttar pradesh news

    पुढील बातम्या