मुस्लीम मुलांसाठी जेवणाची स्वतंत्र खोली, या सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका

सरकारी शाळांमध्ये मुस्लीम मुलांसाठी मिड डे मिलच्या जेवणाची स्वतंत्र खोली करण्याचे आदेश ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. यावरून पुन्हा एकदा भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस असं राजकारण रंगलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 05:40 PM IST

मुस्लीम मुलांसाठी जेवणाची स्वतंत्र खोली, या सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका

कोलकाता, 28 जून : सरकारी शाळांमध्ये मुस्लीम मुलांसाठी मिड डे मिलच्या जेवणाची स्वतंत्र खोली करण्याचे आदेश ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. यावरून पुन्हा एकदा भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस असं राजकारण रंगलं आहे.

ज्या शाळांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लीम विद्यार्थी आहेत तिथे मुस्लीम मुलांसाठी जेवणाची स्वतंत्र खोली असावी, असं धोरण पश्चिम बंगाल सरकारने केलं आहे. यावर भाजपने तीव्र नाराजीची प्रतिक्रिया दिली आहे.

विभाजनाचं राजकारण

ममता बॅनर्जी त्यांच्या राज्यात विभाजनाचं राजकारण करत आहेत, असं भाजपने म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये धर्माच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम सुरू आहे, असा आरोप पश्चिम बंगालचे भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे.

सरकारच्या या निर्णयला होणारा विरोध पाहून ममता बॅनर्जी यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. हा प्रकल्प अल्पसंख्याक आणि मदरसा शिक्षण विभागामार्फत चालवला जात आहे.

Loading...

अल्पसंख्याक मुलांचं प्रमाण जास्त असलेल्या संस्थांमध्ये असे प्रकल्प राबवण्याचं सरकारचं धोरण आहे. त्यामुळे मुस्लीम मुलांच्या विकासालाच मदत होईल, असं ममता बॅनर्जींच्या सरकारचं म्हणणं आहे.

'नेहरूंनी काश्मीर प्रश्न निर्माण केला', अमित शहांची टीका

ज्या शाळेत 70 टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लीम मुलं शिकतात त्या शाळांची नावं ममतांच्या सरकारने मागवली आहेत. या शाळांमध्ये मुस्लीम मुलांसाठी वेगळी जेवणाची खोली बनवली जाणार आहे. हा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याची तयारी सुरू आहे.

तृणमूल आणि भाजपमध्ये तणाव

पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामधला तणाव अजून निवळलेला नाही. लोकसभा निवडणुकीनंतरही इथे हिंसाचार सुरू आहे. यात अनेक जणांचा बळी गेला आहे. या सगळ्या वादात आता मुस्लीम मुलांसाठी स्वतंत्र जेवणाची खोली करण्याच्या प्रस्तावाची भर पडली आहे.

==========================================================================================

देवदुतानं वाचवले प्राण; VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 05:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...