देशातला सर्वात मोठा दरोडा, रात्री 2 वाजता लुटले MI चे 15 कोटी रुपयांचे मोबाईल

देशातला सर्वात मोठा दरोडा, रात्री 2 वाजता लुटले MI चे 15 कोटी रुपयांचे मोबाईल

960 मोबाईल या प्रमाणे 15 कार्टन्सवर चोरांनी डल्ला मारला आहे. एकूण 14 हजार 500 मोबाईलची साधारण किंमत 15 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.

  • Share this:

चेन्नई, 22 ऑक्टोबर : नवरात्र उत्सवात चोरांचा सुळसुळाटही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूकर्वी गुंडांनी 7 लाखांची बँक लुटल्यानंतर आता आणखीन एक मोठी घटना समोर आली आहे. MI कंपनीचे  (MI Phone Company) मोबाईल घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दरोडा टाकला आहे. अज्ञातांनी मोबाईल (Mobile Phone) घेऊन जाणाऱ्या ट्रकवर हल्ला केला असून त्यातले मोबाईल लंपास केले. यामध्ये जवळपास 15 कोटींचं नुकसान झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या ट्रकमध्ये प्रत्येकी कार्टनला 960 मोबाईल या प्रमाणे 15 कार्टन्सवर चोरांनी डल्ला मारला आहे. एकूण 14 हजार 500 मोबाईलची साधारण किंमत 15 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. चोरांनी या ट्रक चालकावर हल्ला केला आणि त्याला गंभीर जखमी केलं त्यानंतर ट्रकमधील कार्टन्स लुटून पसार झाले.

हा मोबाईलने भरलेला ट्रक तमिळनाडूमधील श्रीपेरमपदूर औद्योगिक वसाहतीतून निघाला होता. शूलगिरी इथे रात्री 2 च्या सुमारास या ट्रकला चोरांनी अडवलं तिथे बाचाबाची झाली आणि दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. पेट्रोलिगसाठी आलेल्या पोलिसांना जखमी अवस्थेमध्ये ट्रक चालक अरुण आणि कुमार दोघे जण दिसले. या दोघांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार घटना तमिळनाडूमध्ये घडली आहे. या आधीदेखील अशाच प्रकारे चार जिल्ह्यामध्ये चोरीचा प्रकार घडला होता. रात्री उशिरा चोरांनी पाळत ठेवून या ट्रक चालकाला अडवलं आणि त्याच्यावर हल्ला केला. ट्रकमधील साहित्य घेऊन फरार झाले. अशाच प्रकार नेल्लोर, चित्तौड़, गुंटूर, वारंगल जिल्ह्यात चोरी करण्यात आली आहे. या प्रकरणी MI कंपनीकडून कोणतीही तक्रार अथवा अशा चोरीची माहिती पोलिसांना देण्यात आली नाही. ट्रक चालकाने पोलिसांना केवळ फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चालकाची माहिती आणि जबाब नोंदवून घेतला आहे.

First published: October 22, 2020, 1:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या