धक्कादायक! पुलावर 19 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत, बॅनरवर लिहलं - देशभक्त व्हा

धक्कादायक! पुलावर 19 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत, बॅनरवर लिहलं - देशभक्त व्हा

मेक्सिको शहरातील गँगवॉर भडकल्यानंतर प्रशासन आणि शत्रू गटाला धमकी देण्यासाठी जवळपास 19 लोकांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

मेक्सिको, 10 ऑगस्ट : उत्तर अमेरिकेतील मेक्सिको शहरातील गँगवॉर पुन्हा एकदा भडकले असून एका पुलाला अडकवलेले जवळपास 19 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले आहेत. यातील 7 मृतदेह रस्त्याकडेला छिन्नविछिन्न अवस्थेत होते. मृत व्यक्तींचे हात बांधले होते. मृतदेहांशेजारी काही फलक पोलिसांना आढळले. देशभक्त व्हा! वियग्राला संपवून टाका असं फलकांवर लिहण्यात आलं होतं.

पोलिसांना गुरुवारी एकूण 19 मृतदेह सापडले आहेत. पुलाला लटकलेल्या अवस्थेत या मृतदेहांशेजारी ड्रग्स तस्करांनी धमकीही दिली आहे. पश्चिमेकडील राज्य मिचोआकानमधील नागरिकांनी या घटनेची माहिती दिली. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या गँगमधील वाद पुन्हा उफाळून आला आहे. 2006 ते 2012 या कालावधीत इथं गँगवॉरनं कळस गाठला होता. त्यावेळी प्रशासनाला आणि शत्रू समजल्या जाणाऱ्या गँगला संदेश देण्यासाठी लोकांची हत्या करून त्यांचे मृतदेह रस्त्याकडेला फेकून दिले जात होते.

मिचोआकानमधील अटॉर्नी जनरल एड्रियन लोपेज सोलिज यांनी सांगितलं की, पुलाला लटकलेले दोन मृतदेह हे अर्धनग्नावस्थेत होते. याशिवाय त्यांच्या गळ्यात फास होता तर मृतांमध्ये एका महिलेचा छिन्न-विछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला.

हत्या करण्यात आलेले लोक उरूपान शहरातील आहेत. त्यांना गोळ्या मारण्यात आल्या आहेत. मृतदेहांजवळ मिळालेल्या फलकांवरून कोणी कृत्य केलं हे स्पष्ट होत नाही. मात्र, कुख्यात गँग जलिस्कोनं हे हत्याकांड केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

PHOTO : या चिमुरडीच्या रडण्याचं कारण ऐकून तुम्हीही करा विचार

SPECIAL REPORT : स्वर्गीय आर.आर.पाटलांचा फेमस अलमट्टी किस्सा!

Published by: Suraj Yadav
First published: August 10, 2019, 8:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading