गरोदर बकरीवर बलात्कार करणारे दोन जण सापडले

गरोदर बकरीवर बलात्कार करणारे दोन जण सापडले

हरियाणातील मेवातमध्ये एका बकरीवर आठ लोकांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

  • Share this:

हरियाणा, 04 आॅगस्ट : बकरीवर गँगरेप प्रकरणी हरियाणातील नूंह मेवात गावातील दोन विकृत नराधमांना अटक करण्यात आलीये. नगीना गावातील मरोडा पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली. तपास अधिकारी राजबीर सिंह यांनी मुख्य आरोपी सावकार आणि जाफरला काल अटक केली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने या दोन्ही आरोपींना कोठडी सुनावली

हरियाणातील मेवातमध्ये एका बकरीवर आठ लोकांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. बलात्काराच्या दुसऱ्या दिवशी बकरीचा मृत्यू झाला. बकरीच्या मालकाने २६ जुलैला या प्रकरणी तक्रार नोंदवली. पोलीस याप्रकरणाशी चौकशी करत आहेत. ज्या आरोपींविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे, ते सर्व आरोपी फरार आहेत. मृत बकरीची वैद्यकीय चाचणी केली असून, लवकरच त्याच्या अहवाल मिळेल. ज्या बकरीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला ती बकरी गरोदर होती.

नगीना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजबीर सिंहने सांगितले की, ‘असलू नावाच्या व्यक्तीने २६ जुलैला ठाण्यात तक्रार नोंदवली. २५ जुलैला त्यांच्या बकरीवर सावकर, हारून, जाफर आणि अन्य पाच व्यक्तींनी बलात्कार केला. इतर पाच लोकांची ओळख अजून पटायची आहे.. आणखी फरार पाच आरोपींचा शोध सुरू असून लवकरच अटक करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.

संबंधीत बातम्या

८ लोकांनी गरोदर बकरीवर केला सामुहिक बलात्कार

आता व्हॉट्सअॅप तुमच्या स्टेटसवरून पैसे कमावण्याच्या तयारीत!

विराटचं शतक वाया, इंग्लंडचा 31 धावांनी विजय

 पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षावाले बनले महापौर, राहुल जाधव 80 मतांनी विजयी

सासरच्यांनी विवाहितेला खांबाला बांधून जिवंत जाळलं,आरोपी अजूनही मोकाटच

 

First published: August 4, 2018, 9:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading