नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : देशभरात कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या वाढत असली तरी काही राज्यांनी यावर नियंत्रण मिळवलं आहे. नवी दिल्लीतही कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात आली आहे. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे येथील अनेक सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी केंद्राकडे विनंती केली आहे की, दिल्ली मेट्रो ट्रायल बेसिसवर फेजनुसार सुरू करण्याची परवानगी दिली जावी. लवकरच केंद्र सरकार (Central Government) याबाबत निर्णय घेईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले की गेल्या आठवड्यात इंडस्ट्री असोसिएशनसह त्यांनी बैठक घेतली होती. तेथे त्यांना अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या, ज्यावर ते काम करीत आहेत. ते म्हणाले की येत्या दिवसात इंडस्ट्रीच्या भागातील काही मोठ्या घोषणा करण्यात येणार आहेत.
इस समय ट्रांसपोर्ट की बहुत ज्यादा समस्या हो रही है। मैंने केंद्र सरकार से प्रार्थना की है। दिल्ली में अब कोरोना की स्थिति ठीक हो रही है। दिल्ली में हम मेट्रो खोलना चाहते हैं। दिल्ली में ट्रायल बेसिस पर मेट्रो चलने की इजाज़त अब मिलनी चाहिए : दिल्ली CM अरविंद केजरीवाल pic.twitter.com/btjCyYaFJs
— ANI_HindiNews (@AHindinews) August 23, 2020
कोरोनाच्या कहरात देशभरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर दिल्ली आपात्कालिन प्राधिकरणाने 24 ते 30 ऑगस्टपर्यंत परीक्षणाच्या आधारावर आठवडा बाजार सुरू करण्याची परवानगी दिली, यांनंतर दिल्लीत 12 आठवडी बाजार सोमवारी म्हणजेच 24 ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत. जिल्हा अधिकारी आणि नगर निगमांनी कोविड - 19 च्या उपायांसाठी नव्या योजना तयार केल्या आहेत.