#MeTooचं नंतर पुढे काय होतं?

सेक्शुअल हॅरासमेंट म्हणजे काय? नेमकं काय आक्षेपार्ह असू शकतं हे पुरुषांना समजणं आवश्यक आहे आणि कुठल्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता किंवा सहन करता तक्रार करायची हे स्त्रियांना समजणं आवश्यक आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2018 07:18 PM IST

#MeTooचं नंतर पुढे काय होतं?

कामाच्या ठिकाणी स्त्रियांवर होणारा लैंगिक छळ प्रतिबंध कायदा 2013. Sexual Harassment of Women at Workplace (Prevention, Prohibition and Redressal) Act, 2013 लागू झाल्यानंतर कायद्यानं हे स्पष्ट केलंय की, याविषयीची तक्रार महिला कधीही करू शकते.

कामाच्या ठिकाणी स्त्रियांवर होणारा लैंगिक छळ प्रतिबंध कायदा 2013. Sexual Harassment of Women at Workplace (Prevention, Prohibition and Redressal) Act, 2013 लागू झाल्यानंतर कायद्यानं हे स्पष्ट केलंय की, याविषयीची तक्रार महिला कधीही करू शकते. पण लैंगिक छळवणूक म्हणजे नेमकं काय? कायद्याच्या क्षेत्रात यातलं काय काय येतं?

ऑफिसमधली एखादी व्यक्ती तुमचा लैंगिक छळ करत असेल, (म्हणजे यात तुमच्याशी अश्लील संवाद साधणं, तुम्हाला नको त्या ठिकाणी स्पर्श करणं, अश्लील विनोद सांगणं, पाठवणं किंवा अश्लील भाषेत टीका-टिप्पणी करणं, पाठलाग करणं, नको असताना जवळीक साधायचा प्रयत्न करणं हे सगळं आलं) तर स्त्री त्या व्यक्तीची तक्रार करू शकते.

तक्रार करण्यापूर्वी त्या स्त्रीनं आपला विरोध स्पष्ट शब्दांत त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. हा सगळा प्रकार आपल्याला नकोय, हे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे.

विशाखा गाईडलाईन्स या नावानं या लैंगिक छळवणूक विरोधी कायद्याच्या तरतुदी प्रसिद्ध आहेत. या विशाखा गाईडलाईन्सनुसार प्रत्येक ऑफिसमध्ये अशा लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी अंतर्गत समिती असते. त्या समितीची प्रमुख महिलाच असणं आवश्यक आहे. या समितीपुढे कुठलीही स्त्री आपली तक्रार नोंदवू शकते.

बऱ्याचदा अशा लैंगिक शोषण किंवा छळवणुकीचा प्रकार झाल्यानंतर स्त्रीला तिथल्या तिथे तक्रार करणं शक्य नसतं. मानसिक दबाव, बदनामी किंवा कायद्याचं अपुरं ज्ञान, कुणाची मदत मिळण्याची शक्यता नाही अशा अनेक कारणांमुळे स्त्रिया लगेच पुढे येऊन तक्रार नोंदवत नाहीत. त्यांना या कायद्यानं पूर्वी झालेल्या छळाच्या तक्रारीही नोंदवण्याची सुविधा दिली आहे. फक्त तक्रार करायला उशीर झाला म्हणून पोलीस लैंगिक छळवणुकीचा गुन्हा नोंदवणं टाळू शकत नाहीत.

Loading...

बऱ्याचदा महिलेचा ज्या ठिकाणी, ज्या ऑफिसमध्ये लैंगिक छळ झाला ते ऑफिस सोडून महिला बाहेर पडलेली असते किंवा छळ करणारी व्यक्ती त्या संस्थेत नसते. अशा वेळी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा मार्ग असतोच.

लैंगिक छळवणुकीची तक्रार प्रत्यक्ष घटनेनंतर काही काळानं केली असेल, तर कोर्ट या घटनेची सखोल चौकशी करतं आणि मुद्दाम कायद्याचा गैरवापर करण्यासाठी जुन्या तक्रारीचा आधार घेतला जात नाहीये ना हे तपासलं जातं.

सर्वप्रथम अशा तक्रारींचा FIR नोंदवला जातो. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर चार्जशीट तयार केली जाते आणि मगच आरोपीची चौकशी सुरू होते.

अशी तक्रार ज्याच्यावर झाली, त्या पुरुषाला स्वतःचं म्हणणं मांडायची संधी दिली जाते. त्या पुरुषाला निर्दोष सिद्ध करावं लागतं.

अशी तक्रार ज्याच्यावर झाली, त्या पुरुषाला स्वतःचं म्हणणं मांडायची संधी दिली जाते. त्या पुरुषाला स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करावं लागतं.

अकारण बदनामी केली या कारणासाठी तो पुरुष स्त्रीवर बदनामीचा खटला दाखल करू शकतो. अशी बदनामीची तक्रार दाखल करायला मात्र वेळेचं बंधन आहे. सिव्हिल कोर्टात ३ वर्षांच्या आत बदनामीचा खटला दाखल करावा लागतो. फौजदारी गुन्हा दाखल करायचा असेल तर वर्षाच्या आतच करावा लागतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2018 06:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...