Elec-widget

एम.जे. अकबर राजीनामा द्या, पंतप्रधान मौन सोडा - शिवसेनेने साधला भाजपवर निशाणा

एम.जे. अकबर राजीनामा द्या, पंतप्रधान मौन सोडा - शिवसेनेने साधला भाजपवर निशाणा

अकबर यांच्य राजीनाम्याची मागणी करून शिवसेनेने विरोधीपक्षांच्या सुरात सूर मिसळला आहे.

  • Share this:

मुंबई, ता. 11 ऑक्टोबर : केंद्रात सत्तेत सहभागी असलेल भाजपचा मित्र पक्ष शिवसेनेने परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांचा राजीनामा मागितलाय. अकबर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले असताना अजून ते मंत्रीपदावर कसे आहेत असा सवाल शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केलाय. अकबर यांच्य राजीनाम्याची मागणी करून शिवसेनेने विरोधीपक्षांच्या सुरात सूर मिसळला आहे. कायंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्या म्हणाल्या, मुंबईच्या पावसावर 'मन की बात' मध्ये बोलणारे पंतप्रधान या गोष्टीवर मौन बाळगून आहेत. ते का बोलत नाहीत असा सवालही त्यांनी केला. भाजप महिलांच्या हक्कांविषयी गंभीर नाही. 'बेटी बचाव, बेटी पढाव' ही घोषणा फक्त दाखवण्यासाठीच आहे असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसनेही केली होती अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी

#MeToo चळवळीत लैंगिक छळाचा आरोप झालेले परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे.अकबर यांची हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेसनेही केली होती. पक्षाचे प्रवक्ते जयपाल रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. अकबर यांच्यावर चार महिला पत्रकारांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव येतोय. त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांची हकालपट्टी करा अशी मागणीही होतेय.

रेड्डी म्हणाले, एम.जे. अकबर अतिशय महत्वाच्या पदावर आहेत. त्यांनी त्यांच्यावरच्या आरोपांच तातडीनं खंडण करावं आणि स्पष्टीकरण दिलं पाहिजे. या प्रकरणावर सुषमा स्वराज यांनी जे मौन धारण केलं त्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही टीका केलीय.

त्या म्हणाल्या, सुषमाजी तुम्ही या देशातल्या लाखो मुलींच्या आदर्श आहात. अकबर मंत्री असलेल्या विभागाच्या प्रमुख असल्याने तुम्ही कारवाई केली पाहिजे. काही दिवसांपूर्वी या संदर्भात सुषमा स्वराज यांना एका पत्रकाराने थेट प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी कुठलही उत्तर दिलं नाही. त्यामुळं त्यांच्यावरही टीका होतेय.

Loading...

अकबर हे 'द टेलिग्राफ', 'एशियन एज' आणि 'द संडे गार्डियन' या वृत्तपत्रांचे संपादक होते. सध्या ते भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. संपादक असतानाच्या कार्यकाळात नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलेल्या आणि त्यांच्या काही महिला सहकाऱ्यांनीच त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. हॉटेलच्या खोलीत बोलावून अश्लिल संभाषण करणं, मद्य पिण्यासाठी आग्रह करणं, आक्षेपार्ह शेरेबाजी करणं असे अनेक आरोप एम.जे. अकबर यांच्यावर लावण्यात आले आहेत.

#MeToo या मोहिमेत अनेक पत्रकारांवरही आरोप झाले असून त्यामुळं अनेकांना राजीनामे द्यावे लागले होते. बॉलिवूड, पत्रकारीता आणि आता राजकरण्यांवरही आरोप होऊ लागल्याने खळबळ उडालीय. वर्षभरापूर्वी अमेरिकेत MeToo ही चळवळ सुरू झाली होती.

'असे बरेच प्रश्न आहेत' बलात्काराच्या प्रश्नावर गिरीष बापटांची उडवाउडवी

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 03:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...