• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • इंटरनेटवरुन शिकला पद्धत...कंपनीशी केला करार; आता शेतकरी घेतोय लाखोंच उत्पादन

इंटरनेटवरुन शिकला पद्धत...कंपनीशी केला करार; आता शेतकरी घेतोय लाखोंच उत्पादन

एकीकडे कृषी कायद्याचा (Farmer) विरोध केला जात आहे. दुसरीकडे एका शेतकऱ्याचा अद्भूत अनुभव समोर आला आहे. या शेतकऱ्याने अनोख्या प्रकारे शेती करुन एक नवा आदर्श समोर ठेवला आहे.

 • Share this:
  हरियाणा, 16 डिसेंबर : जगभरात एकीकडे कृषी कायद्याचा (Farmer) विरोध केला जात आहे. यासाठी नवी दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. दुसरीकडे हरियाणातील जींद जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा अद्भूत अनुभव समोर आला आहे. या शेतकऱ्याने अनोख्या प्रकारे शेती करुन एक नवा आदर्श समोर ठेवला आहे. पोली गावातील रहिवासी शेतकरी शमशेर मलिक यांनी कंपनीबरोबर करार करीत मोत्याची लागवड सुरू केली व आपले उत्पन्न वाढवले. दरमहिन्याला मोत्याच्या लागवडीपासून सुमारे 50 हजार रुपये उत्पन्न वाढले आहे. शेमशेर मलिक यांनी सांगितलं की, त्यांचं स्पेअर पार्ट्सचं दुकान आहे. मात्र त्यातून जास्त उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे इंटरनेटवर त्यांनी उत्पन्न वाढविण्याचे पर्याय शोधले. शमशेर यांच्याजवळ जमिनही फार नव्हती. अशात त्यांनी नवा पर्याय शोधला. शेतकऱ्याने पावन धरती नावाच्या कंपनीसोबत करार केला. व सुरुवातील साडे पाच लाख रुपये खर्च केले. कंपनीने याऐवजी शेतकऱ्याच्या घरात 280 स्क्वेअर फूट एक टँक तयार केला. त्यामध्ये सुमारे 12 हजार ऑयस्टर ठेवण्यात आले आहेत, ज्यामध्ये मोती तयार केले जाते. मोत्याला तयार होण्यासाठी सुमारे एक वर्ष लागते. यासाठी कंपनी त्यांना दर आठवड्याला साडे बारा हजार रुपये देत आहे. याखेरीज ऑयस्टर फार्मचं रक्षण व वीज बिलासाठी 5000 रुपये मिळत आहे. कंपनीसोबत त्यांनी दोन वर्षांचा करार केला आहे. कोर्टाने त्यांना साडेपाच लाखांची हमी म्हणून अनेक भूखंडांची रजिस्ट्री मिळाली आहे. ऑयस्टरची देखरेख करण्यासाठी डॉक्टरांची टीम दर आठवड्याला येते, ज्याचा खर्च कंपनी स्वतःच उचलत आहे. मोती तयार झाल्यानंतर, कंपनी संपूर्ण विक्री रकमेच्या पाच टक्के रक्कम स्वतंत्रपणे देईल. एका मोतीची किंमत 160 रुपये शमशेर यांनी सांगितलं की त्यांच्याजवळ 12000 ऑयस्टर आहेत. एका ऑयस्टरमधून चार ते मोती तयार होतात. एका मोतीची किंमत 160 रुपये आहेत. जर सर्व ऑयस्टर मृत झाले तरीही शेतकऱ्याला मृत ऑयस्टरच्या किंमतीतील 5 टक्के मिळतं. शेतकऱ्याने सांगितलं की, मृत ऑयस्टरचा उपयोग औषधांसाठी केला जातो.
  Published by:Meenal Gangurde
  First published: