S M L

हवामान विभागाचा हाय अलर्ट; या राज्यांना सतर्कतेचा इशारा

हवामान विभागानं वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

Updated On: Apr 26, 2019 02:21 PM IST

हवामान विभागाचा हाय अलर्ट; या राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली, 26 एप्रिल : पुढील काही तासात मोठ्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. याचा फटका हा उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांना बसण्याची देखील शक्यता आहे. हवामान विभागानं त्याकरता या तिन्ही राज्यांमध्ये हाय अलर्ट देखील जारी केला आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणात गर्मी आहे. दिल्ली एनसीआरसह उत्तर भारताला येणाऱ्या वादळाचा तडाखा बसू शकतो. उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये धुळीच्या वादळाची शक्यता यावेळी हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तर, काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता देखील यावेळी हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

काय आहेत कारणं?

दरम्यान, हिंदी महासागरात हवेचा दबाव कमी झाला आहे. तर, बंगालच्या खाडीमध्ये दक्षिण भागात वादळाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे हवामानामध्ये बदल झाला आहे. या बदलामुळे जवळपास 65 किलोमीटर प्रतितास वेगानं हवेचा जोर असेल असं देखील हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. या हवामान बदलामुळे उत्तर भारतात त्याचा परिणाम जाणवू शकतो.


सध्या मोठ्या प्रमाणावर गर्मी आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्यानं गर्मीपासून हैराण नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पण, धुळीच्या वादळाचा मात्र नागरिकांना सामना करावा लागणार आहे. तसंच तामिळनाडू आणि पॉडेचेरीमेध्ये देखील पावसाची शक्यता यावेळी हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राला किती फटका बसणार

उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान आणि हरियाणाचा यामध्ये हवामान विभागानं उल्लेख केला आहे. पण, महाराष्ट्राला याचा फटका बसेल की नाही याबाबत कोणताही उल्लेख हा हवामान विभागानं केलेला नाही.

Loading...


VIDEO: भाजपच्या 'या' मुस्लीम नेत्यानं साध्वी प्रज्ञांचा प्रचार करण्यास दिला थेट नकार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 02:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close