हवामान विभागाने या राज्यांना जारी केलं रेड अलर्ट! मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता

हवामान विभागाने या राज्यांना जारी केलं रेड अलर्ट! मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये सातत्याने पाऊस कोसळत आहे, येत्या काही दिवसातही पावसाची आशंक वर्तवण्यात येत आहे

  • Share this:

नवी दिल्‍ली, 24 ऑगस्ट : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये पाऊस थांबायचे नावचं घेत नसल्याचे दिसत आहे. येत्या काळातही पावसाचा हा खेळ असाच सुरू राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राजस्‍थान (Rajasthan), सौराष्‍ट्र (Saurashtra) आणि कच्‍छ (Kutch) मध्ये  आज मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने सांगितले की, दक्षिण राजस्‍थानच्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे, जी येत्या 2 दिवसात पश्चिम दिशेने सरकू शकतो. तर पुढील दोन दिवसांपर्यंत मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थित असेल असे सांगण्यात येत आहे.

हे वाचा-Unlock 4.0ची तयारी सुरू, शाळा बंदच राहणार; जाणून घ्या नव्या नियमांबद्दल

ओडिशामध्ये 25 ऑगस्ट रोजी होणार सर्वाधिक पाऊस 

हवामान विभागाने सांगितले की अशात दक्षिण-पश्चिम राजस्थान आणि गुजरातमधील काही भागात मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता आहे. तर पूर्व राजस्थानमध्ये 25 ऑगस्ट रोजी जास्त पावसाशी संभावना आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. याशिवाय 24, 25 आणि 26 ऑगस्ट रोजी ओडिशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे पिकांचं नुकसान होऊ शकतं. ओडिशामध्ये 25 ऑगस्ट रोजी सर्वाधिक पावसाची शक्यता आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 24, 2020, 7:23 PM IST

ताज्या बातम्या