धक्कादायक! मानेला दोरी बांधून तरुणाला नेलं फरफटत,15 किमी दूर रक्ताचे ओघळ

धक्कादायक! मानेला दोरी बांधून तरुणाला नेलं फरफटत,15 किमी दूर रक्ताचे ओघळ

उत्तर प्रदेशमधल्या मेरठमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाला त्याच्या मानेला दोरी बांधून अज्ञात इसमांनी फरफटत नेलं. त्याच्या रक्ताचे ओघळ 15 किलोमीटरपर्यंत उमटले.

  • Share this:

मेरठ (उत्तर प्रदेश)25 सप्टेंबर : उत्तर प्रदेशमधल्या मेरठमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाला त्याच्या मानेला दोरी बांधून अज्ञात इसमांनी फरफटत नेलं. त्याच्या रक्ताचे ओघळ 15 किलोमीटरपर्यंत उमटले.

मुकुल कुमार असं या 21 वर्षाच्या तरुणाचं नाव आहे. तो हापुडमध्ये राहणारा आहे. काही अज्ञात इसमांनी या तरुणाला मानेला दोरी बांधून ओढत नेलं. त्यांना मुकुल कुमारला बाइकला बांधलं होतं.

ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्ट मार्टेमसाठी पाठवला. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे पण अजून कुणाला अटक केलेली नाही.

या तरुणाला अशा पद्धतीने फरफटत नेण्यात आलं की त्याच्या शरीराची खूप वाताहत झाली. त्याचा एक हात आणि एक पाय जवळजवळ गायब झाला.

PMC बँकेच्या कारवाईनंतर या 9 बँका बंद होणार का? RBI ने केला खुलासा

या तरुणाच्या मृतदेहावर गोळी लागल्याच्या खुणाही आहेत. मुकुलचा चेहरा आणि डोक्याला गोळ्या लागल्या, असं पोलिसांनी सांगितलं. मुकुलचं रक्त जिथे सांडलं होतं तिथपर्यंत जाऊन पोलिसांनी या घटनेचा माग घेतला.

मुकुल त्याच्या कुटुंबासोबत राहत होता त्या जागीही पोलीस जाऊ पोहोचले. त्याच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक बाइकही सापडली. मुकुल तसा खूपच लाजाळू होता, त्याचं कुणाशी शत्रुत्वही नव्हतं, असं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. या सगळ्या घटनेमागे कुणाचा हात असावा याचा तपास पोलीस करत आहेत.

======================================================================================

VIDEO : शरद पवार Uncut प्रेस कॉन्फरन्स; म्हणाले, 27 तारखेला मीच ED ऑफिसला जाणार

First published: September 25, 2019, 5:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading