कॉलेजचा गेट तोडून 100 पुरुष कॅम्पसमध्ये शिरले आणि...विद्यार्थिनींचा थरकाप उडवणारा अनुभव

कॉलेजचा गेट तोडून 100 पुरुष कॅम्पसमध्ये शिरले आणि...विद्यार्थिनींचा थरकाप उडवणारा अनुभव

हा प्रकार सुरू असतानादेखील महाविद्यालयीन कर्मचारी आणि पोलीस मदतीसाठी आले नाहीत

  • Share this:

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : राजधानी दिल्लीतील गार्गी महाविद्यालयात (Gargi College) विद्यार्थिनींसोबत छेडछाडीची (Molestation) घटना समोर आली आहे. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी विद्यार्थिनीने याबाबत खुलासा केला. तिने सांगितले की, 4 फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात फेस्टचे (College Fest) आणि 6 तारखेला स्टार नाइटचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी स्टार नाइटच्या दिवशी (Star Night) 100 हून जास्त पुरुष महाविद्यालयाचा गेट तोडून आत शिरले. आणि मुलींसोबत गैरवर्तणूक करू लागले. एका विद्यार्थिनीने घटनेचा संदर्भ देताना सांगितले की, 'मी तिथे होते, पण मला असा काही अनुभव आला नाही. माझ्या मैत्रिणींनी सांगितले की, पुरुषाने तिच्या कंबरेत हात घातला होता. हा प्रकार सुरू असतानादेखील महाविद्यालयीन कर्मचारी आणि पोलीस मदतीसाठी आले नाहीत. ते म्हणाले की, तुम्हाला खूप असुरक्षित वाटत असेल तर कॉलेजमध्ये का येता, कॉलेज फेस्टला का येता? दिल्ली कमिशन फॉर वुमनची (डीसीडब्ल्यू) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी दुपारी 12 वाजता गार्गी कॉलेजला भेट दिली आहे.

महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी फोन उचलला नाही

या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या, 'मी रात्री ट्विटरवर याबद्दल वाचले होते, मुलींनी ट्विट केलं होतं की मुलांनी महाविद्यालयात शिरून त्यांची छेडछाड केली आणि प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. रेखा शर्मा म्हणाल्या की, मी तेथे एक टीम पाठविली आहे. आम्ही प्राचार्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी फोन उचलला नाही. आम्ही पोलिसांशीही बोलू. संपूर्ण विषयाची माहिती मिळाल्यानंतरच आम्ही काय घडले ते सांगू.

कोणतीही तक्रार मिळाली नाही

डीसीपी दक्षिण अनिल ठाकूर यांनी सांगितले की त्यांच्याकडे याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. महाविद्यालय वा विद्यार्थिनी यांनी देखील तक्रार दाखल केली नाही. ते म्हणाले आम्ही या प्रकरणाचा तपास करीत आहोत. शिवाय सीसीटीव्हीदेखील तपासले जातील.

First published: February 10, 2020, 2:47 PM IST

ताज्या बातम्या