राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मीरा कुमार यांची उमेदवारी दाखल

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मीरा कुमार यांची उमेदवारी दाखल

काँग्रेस नेत्या आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी आज राष्ट्रपतीपदासाठी अर्ज भरला.

  • Share this:

27 जून : काँग्रेस नेत्या आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी आज राष्ट्रपतीपदासाठी अर्ज भरला.

एनडीएनं दलित व्यक्तीला उमेदवारी दिली आणि काँग्रेसनं त्याला शह देण्यासाठी दलित उमेदवार उभा केला. मीरा कुमार यांनी अर्ज भरल्यावर पत्रकार परिषद घेतली. मीरा कुमार या काँग्रेसचे दिवंगत नेते बाबू जगजीवन राम यांत्या कन्या आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जगजीवन राम हे केंद्रात महत्त्वाचे दलित नेते होते.

मीरा कुमार राष्ट्रपतीपदासाठी प्रचाराला साबरमती आश्रमापासून सुरुवात करणार आहे. तसंच येत्या 1 तारखेला त्या पटनाहुन दिल्लीला जाणार आहे आणि तिथे यूपीएच्या घटकपक्षांशी चर्चा करणार आहे.

First published: June 27, 2017, 4:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading