नेटफ्लिक्सवरील वेबसीरिजमुळे मेहुल चोक्सी अस्वस्थ; प्री-स्क्रिनिंगची केली मागणी

नेटफ्लिक्सवरील वेबसीरिजमुळे मेहुल चोक्सी अस्वस्थ; प्री-स्क्रिनिंगची केली मागणी

या वेब सीरिजचा ट्रेलर समोर आल्यानंतर अनेकांनी मेहुल चोक्सीला या सीरिजच्या विषयाचा भाग असल्याची विचारणा केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi Highcourt) ऑनलाइन व्हिडीओ नेटफ्लिक्स (OTT Platform Netflix) ला बुधवारी सांगितले की ‘बॅड ब्वॉय बिल्यनेर्स’ (Bad Boy Billionaires) वेब सीरीज (Web Series) याच्या रिलीजपूर्वी कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्याचा (PNB Scam) आरोपी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याला उपलब्ध करता येऊ शकते.

न्यायमूर्ती नवीन चावला यांनी नेटफ्लिक्सच्या वकिलाला सांगितले की ते चोक्सीला याची ‘प्री-स्क्रीनिंग’ (रिलीजपूर्वी दाखविण्यासाठी) उपलब्ध करण्याबाबत विचार करावा आणि वादावर विराम लावावा. न्यायालयाने याबाबतची पुढील सुनावणी 28 ऑगस्ट रोजी ठरवली आहे.

गीतांजली जेम्स (Gitanjali Gems) चे प्रवर्तक चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी (Nirav Modi) 13,500 कोटी  रुपयांहून अधिक पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचे (Punjab National Bank Scam) आरोपी आहेत. चोक्सीने गेल्या वर्षी देश सोडून पळ काढला होता. ही वेब सीरिज 2 सप्टेंबर रोजी भारतात रिलिज होणार आहे. नेटफ्लिक्सवर या बाबत सांगितले गेले आहे की, ही अशी वेबसीरिज आहे ज्यात भारतातील सर्वाधिक कुख्यात उद्योगपतींचा हव्यास, भ्रष्टाचार आणि फसवणूक समोर आणतो. यामध्ये देशातून पळ काढलेला उद्योगपती विजय माल्या (Vijay Mallya), नीरव मोदी याच्यासह सुब्रत रॉय (Subrat Rai) आणि बी राजू रामलिंग राजू (B Raju Ramalinga Raju) च्या वादग्रस्त मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

चोक्सीच्या वकिलांनी रिलीज डेट टाळण्याची केली विनंती

न्यायालयात चोक्सीचे प्रतिनिधीत्व करण्यारे अधिवक्ता विजय अग्रवाल यांनी ही वेब सीरिजच्या रिलिजची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.

ते म्हणाले, याचा ट्रेलर पाहिला आहे आणि जगभरातून त्यांना याबाबत कॉल येत आहेत. ज्यात त्यांना या वेबसीरिजच्या विषयाचा भाग असल्याची विचारणा केली जात आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 26, 2020, 7:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading