घोटाळेबाज मेहुल चोकसीला दणका, अँटिगाचे पंतप्रधान म्हणाले...

घोटाळेबाज मेहुल चोकसीला दणका, अँटिगाचे पंतप्रधान म्हणाले...

पंजाब नॅशनल बँकेला 14 हजार कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या मेहुल चोकसी याला मोठा दणका बसला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर: पंजाब नॅशनल बँकेला 14 हजार कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या मेहुल चोकसी याला मोठा दणका बसला आहे. भारतीय तपास यंत्रणेपासून तसेच अटकेपासून वाचण्यासाठी अँटिगा देशात शरण घेणाऱ्या चोकसीला येथील पंतप्रधानांनी घोटाळेबाज असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी सांगितले की, चोकसी एक घोटाळेबाज आहे आणि भारतीय तपास यंत्रणा अँटिगामध्ये येऊन त्याची चौकशी करू शकतात.

पंजाब बँक घोटाळ्यातील (PNB Scam) चोकसी हा मुख्य आरोपी आहे. चोकसीने अँटिगाच्या सिटिझनशिप बाय इन्व्हेस्टमेंट प्रोग्रामच्या नियमांचे भंग केला आहे. या नियमांचा वापर करुन त्याने अँटिगाची नागरिकता घेतली होती. भारतात 14 हजार कोटींचा घोटाळाकरून परदेशात फरार झालेल्या चोकसीची नागरिकता अँटिगाने रद्द केली आहे. चोकसीला अँटिगाची नागरिकता मिळाली होती. पण आता आम्ही ती रद्द केली आहे. लवकरच चोकसीला भारताच्या ताब्यात दिले जाईल. आम्ही कोणत्याही आरोपीस आमच्या देशात सुरक्षित ठेवणार नाही.

त्याआधी अमेरिकेतील एका न्यायालयाने चोकशीची अमेरिकेतील कंपनी सॅम्युअल ज्वेलर्सविरुद्ध चौकशीचे आदेश दिले होते. ही कंपनी ग्राहकांना खरे हिरे देण्याऐवजी लॅबमध्ये तयार झालेले हिरे देत असल्याचे समोर आले होते. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, चोकसी आयर्लंड येथील एका प्रयोगशाळेत छुप्या पद्धतीने हिऱ्यांची निर्मिती करत होता. गीतांजली जेम्स लिमिटेडची मालकी हक्क असलेल्या सॅम्युअल ज्वेलर्सला पंजाब नॅशनल बँकेने गीतांजलीद्वारे दिलेल्या वचन पत्राच्या आधारावर दोन कोटी डॉलर्स (जवळ जवळ 139 कोटी रुपये)चे कर्ज दिले होते.

VIDEO: मुसळधार पावसामुळे कऱ्हा नदीचं रौद्र रूप; जनावरांसह ग्रामस्थांचं स्थलांतर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 07:43 AM IST

ताज्या बातम्या