श्रीनगर, 17 मार्च : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी नवग्रह मंदिरात महादेवाला केलेल्या अभिषेकामुळे वाद निर्माण झाला आहे. देवबंदच्या मौलानांनी मेहबूबा मुफ्तींची ही कृती इस्लामविरोधी असल्याचं म्हटलंय. तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून मेहबूबा यांचे हे नाटक असल्याची टीका करण्यात आलीय.
मेहबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी नवग्रह मंदिराला भेट दिली होती. यावेळी त्यांनी गाभाऱ्यात जाऊन महादेवाला अभिषेकही केला. याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर यावर उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. मेहबूबा यांनी जे केलं आहे ते इस्लामच्या तत्वात बसत नाही, ते इस्लामविरोधी आहे असं देवबंदचे मौलाना आणि इत्तेहाद उलेमा-ए-हिंदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुफ्ती असद कासमी यांनी म्हटलं.
'फक्त 5 वर्ष थांबा, मग...', नितीन गडकरी करणार 'द एण्ड', थेट घोषणाच केली!
दरम्यान, आता होत असलेल्या आरोपांवर मेहबूबा मुफ्ती यांनीही प्रतिक्रिया दिलीय. त्या म्हणाल्या की, सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये सारखीच परिस्थिती आहे.
मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं की, भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे आणि कोणत्याही मंदिरात गेल्यानं असा वाद होऊ नये. यशपाल शर्मा यांनी मंदिर उभारलं होतं. मला मंदिरात जाऊन ते बघायचं होतं. कुणीतरी प्रेमाने माझ्या हाती कलश दिला आणि मी त्या कलशाने जलाभिषेक केला. हा माझा वैयक्तिक मुद्दा आहे आणि यावरून अधिक वाद करण्याची गरज नाही.
पुँछ जिल्ह्यातील दौऱ्यावेळी मेहबूबा मुफ्ती या नवग्रह मंदिरात गेल्या होत्या. त्यावेळी मेहबूबा मुफ्ती यांनी पूजाही केली. त्यानतंर मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि शिवलिंगावर जलाभिषेक केला. याशिवाय मंदिर परिसरात असलेल्या यशपाल शर्मा यांच्या पुतळ्यावर पुष्पवर्षावही करण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jammu and kashmir