News18 Lokmat

पाकने अणुबाँब ईदसाठी थोडीच ठेवलाय? : मेहबुबा मुफ्तींची मुक्ताफळं

जर भारताने अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवली नाहीत तर काय पाकिस्तानने अणुबॉम्ब ईदसाठी ठेवली आहेत का?

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 06:26 PM IST

पाकने अणुबाँब ईदसाठी थोडीच ठेवलाय? : मेहबुबा मुफ्तींची मुक्ताफळं

नवी दिल्ली, 22 एप्रिल: पाकिस्तान आत्तापर्यंत अणुबॉम्बची भीती दाखवत होता, ती भीती आम्ही दूर केली. आमच्याकडची शस्त्रास्त्रे ही काही फक्त दिवाळीसाठी नाहीत असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजस्थानमधील बाडमेर येथील सभेत दिला होता. PM मोदींच्या या विधानावर आता राजकारण सुरू झाले आहे. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी याप्रकरणी थेट पाकिस्तानची बाजू घेतली आहे.

हे देखील वाचा: पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे तर भारताची शस्त्र काय दिवाळीसाठी आहेत का? - मोदी

PM मोदींच्या विधानाचा दाखला देत मेहबूबा यांनी ट्विट केले. त्या म्हणतात, जर भारताने अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवली नाहीत तर काय पाकिस्तानने अणुबॉम्ब ईदसाठी ठेवली आहेत का? PM मोदींनी अशा प्रकारच्या खालच्या स्तरावरच्या राजकारणापासून दूर राहिले पाहिजे.

राजस्थानमधील सभेत मोदी म्हणाले होते की, पाकिस्तान प्रत्येक दिवशी म्हणत असतो की आमच्याकडे अण्विक बटन आहे, अण्विक बटन आहे. पत्रकार देखील म्हणतात की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. तर मग आमच्याकडे काय आहे. भारताकडील अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवले नाहीत. आम्ही पाकिस्तानची मस्ती उतरवली आहे. आता ते जगभरात आर्थिक मदत मागत फिरत आहेत.

मोदींच्या या विधानाला उत्तर देण्यासाठी मेहबूबा यांनी पाकिस्तानची बाजू घेतली आहे. अर्थात पाकिस्तानची बाजू घेण्याची मेहबूबा यांची पहिली वेळ नाही. याआधी अनेक वेळा त्यांनी पाकिस्तानची बाजू घेतली आहे. भारता ऐवजी त्या पाकिस्तानचे कौतुक करतात.

Loading...


VIDEO : राष्ट्रवादी नेत्याच्या घरावर गुंडांचा भीषण हल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 06:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...