मराठी बातम्या /बातम्या /देश /

मेहबूबा मुफ्ती काश्मिरचा हा झेंडा फडकावण्याची भाषा करत आहेत; जाणून घेऊया इतिहासजमा झालेल्या झेंड्याबद्दल

मेहबूबा मुफ्ती काश्मिरचा हा झेंडा फडकावण्याची भाषा करत आहेत; जाणून घेऊया इतिहासजमा झालेल्या झेंड्याबद्दल

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा काश्मिरचा जुना झेंडा पुन्हा फडकावण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा काश्मिरचा जुना झेंडा पुन्हा फडकावण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा काश्मिरचा जुना झेंडा पुन्हा फडकावण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

    श्रीनगर, 26 ऑक्टोबर : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा काश्मिरचा जुना झेंडा पुन्हा फडकावण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एक वर्षापूर्वीपर्यंत ज्याप्रकारे काश्मिरचा ध्वज फडकवला जात होता, तसाच तो पुन्हा फडकला गेला पाहिजे, असे त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी देशाचा तिरंगा राष्ट्रध्वज फडकावण्याऐवजी काश्मीरमध्ये पुन्हा काश्मीरचा झेंडा फडकवण्याची भाषा केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. जाणून घेऊ काश्मीरच्या इतिहासजमा झालेल्या ध्वजाबद्दल. केंद्र सरकारने एक वर्षापूर्वी, जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारी घटनात्मक तरतूद कलम 370 रद्द केलं. त्यानंतर काश्मीरमध्ये सर्वत्र तिरंगा फडकवण्यात आला.  त्या आधी घटनेने दिलेल्या अधिकारानुसार काश्मीरचा स्वतंत्र झेंडा होता. पण ती तरतूदच संसदेने रद्द केल्यामुळे तो राज्याचा अधिकृत ध्वज देखील इतिहासजमा झाला. संसदेत घटनात्मक दुरुस्ती करून 5 ऑगस्ट 2019 ला या राज्याचे जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. भारत सरकारच्या या निर्णयानंतर 25 ऑगस्ट 2019 रोजी राज्य सचिवालयाच्या इमारतीवरून राज्य ध्वज काढण्यात आला. आता तिथे फक्त तिरंगा ध्वज फडकवला जातो. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीर राज्याच्या घटनेच्या कलम 144 अन्वये स्वतंत्र लाल रंगाचा ध्वज पूर्वी स्वीकारण्यात आला होता. या झेंड्याचा लाल रंग हा 1931 मध्ये डोगरा राजवटीविरूद्ध झालेल्या निदर्शनादरम्यान मरण पावलेल्या सैनिकांच्या रक्ताचं प्रतीक होता. 13 जुलै 1931ला तत्कालीन राज्याची राजधानी श्रीनगरमध्ये डोगरा राजवटीविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं होतं. निषेधाच्या वेळी पोलीस गोळीबारात 21 जणांचा मृत्यु झाला होता. हे ही वाचा-Jammu and Kashmir: 370वं कलम हटविल्यानंतर भाजपने जिंकली पहिलीच निवडणूक 1952 मध्ये राज्याचा स्वतंत्र ध्वज झाला  7 जुलै 1952 रोजी, राज्याच्या संविधान सभेने एक अध्यादेश काढला आणि 11 जुलै 1939 ला निश्चित केलेला ध्वज राज्याचा अधिकृत ध्वज म्हणून स्वीकारला. खरं तर, 2015 मध्ये जम्मू-काश्मीर राज्याच्या ध्वजावरून वाद झाला होता. जेव्हा राज्यात भाजपच्या आमदारांनी राज्य ध्वज फडकवायला नकार दिला होता. मग मेहबूबा यांनी ध्वज फडकवणं बंधनकारक केलं त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी एक परिपत्रक काढून राष्ट्रध्वजासह राज्य ध्वज फडकवणं बंधनकारक केलं. मात्र, राज्य सरकारने 20 तासांत हे परिपत्रक मागे घेतलं. परंतु, डिसेंबर 2015 मध्ये जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पाठवलेल्या आदेशानुसार सर्व सरकारी इमारती आणि वाहनांवर तिरंग्यासोबत राज्य ध्वज लावणं हा घटनात्मक अधिकार असल्याचं सांगितलं. नेहरू-शेख कराराचा परिणाम स्वतंत्र ध्वज कोर्टाच्या या आदेशानंतर राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री निर्मल कुमार म्हणाले होते की राष्ट्रीय ध्वजाच्या बरोबरीने कोणताही झेंडा फडकवता येणार नाही. वास्तविक, भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन काश्मीरचे पंतप्रधान शेख मोहम्मद अब्दुल्ला यांच्यात 1952 मध्ये करार झाला होता. या करारामध्ये राष्ट्रीय ध्वज तिरंगा असेल असा निर्णय घेण्यात आला. परंतु राज्याच्या शक्ती प्रदर्शित करण्यासाठी राज्य ध्वज देखील मान्य करण्यात आला होता. राष्ट्रीय ध्वजासह राज्य ध्वजदेखील फडकवण्यात येईल असं मान्य करण्यात आलं होतं. त्याचवेळी शेख अब्दुल्ला यांनी असं आश्वासन दिलं होतं की राज्याचा झेंडा हा राष्ट्रीय तिरंग्याला विरोध करण्याचा प्रयत्न करण्यासाठी उभारला जाणार नाही. हे ही वाचा-Kashmir: 'देशभक्तीच्या भावनांना ठेच लागली', मेहबुबा मुफ्तींविरोधात नेत्यांचं बंड जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय ध्वजाचा दर्जा तिरंग्याला देशभरात जो राष्ट्रध्वजाचा मान दिला जातो तोच  जम्मू-काश्मीरमध्येही दिला जाईल, असं नेहरू-शेख करारात मान्य केलं गेलं. राज्याच्या संविधान सभेत 7 जुलै 1952 रोजी अध्यादेशाद्वारे या कराराचा राज्याच्या घटनेत समावेश करण्यात आला. परंतु, जेव्हा जम्मू-काश्मीरच्या महाराजा हरिसिंह यांनी त्यांचं संस्थान भारतामध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी स्वतंत्र राज्यघटना व ध्वज ठेवण्याची कोणतीही अट ठेवली नव्हती. महाराजांनी भारताच्या इतर राज्यांप्रमाणे घटनात्मक हक्कांची मागणी केली होती. भारतीय राज्यघटनेचे पालन करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. 1952 पूर्वी हा होता जम्मू-काश्मीरचा ध्वज जम्मू-काश्मीरमध्ये डोगरा घराण्याने 101 वर्षे राज्य केले. त्या काळात त्यांचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरलं होतं. सध्याच्या जम्मू-काश्मीर, लडाख आणि पाकव्याप्त काश्मिरपर्यंत डोगरा साम्राज्य विस्तारलेलं होतं. हे एक खूप मोठं संस्थान होतं. डोगरा राजवंशाने कायमच काळानुसार हे साम्राज्य अधिक सामर्थ्यवान, समृद्ध केलं. जम्मू-काश्मीरमधील डोगरा राजघराण्याचा पाया राजा गुलाबसिंह यांनी घातला. मग ब्रिटीश साम्राज्याने हे संस्थान शीख साम्राज्यांकडून काही नियम व अटींसह गुलाबसिंग यांना सोपवलं. ब्रिटिश सरकारने त्यांना स्वतंत्र महाराजा म्हणून मान्यता दिली. त्यानंतर 1947 पर्यंत महाराजा गुलाबसिंगांच्या कुटुंबीयांनी येथे राज्य केलं. महाराजा हरिसिंह या संस्थानचे शेवटचे राजे होते. जम्मू-काश्मीरवर डोगरा संस्थानचं राज्य असेपर्यंत इथला झेंडा तीन रंगांच्या पट्ट्यांचा होता. वरच्या व खालच्या पट्ट्या पिवळ्या रंगाच्या आणि मध्यभागी असलेल्या पट्ट्या भगव्या होत्या. हा ध्वज 1952 मध्ये रद्द करण्यात आला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Jammu and kashmir

    पुढील बातम्या