IAS ला सलाम! लॉकडाऊनमध्ये या जिल्ह्यात एकाही मजूराला किंवा गरीबाला ठेवलं नाही उपाशी

IAS ला सलाम! लॉकडाऊनमध्ये या जिल्ह्यात एकाही मजूराला किंवा गरीबाला ठेवलं नाही उपाशी

लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक हाल होत आहेत ते हातावर पोट असलेल्या लोकांचे. मात्र याच लोकांसाठी एका आयएस अधिकाऱ्याने त्याच्या जिल्ह्यात प्रभावी योजना राबवल्या आहेत.

  • Share this:

शिलाँग, 15 मे : कोरोना व्हायरसचं संकट थोपवण्यासाठी देशात 24 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. याकाळात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे स्थानिक पातळीवर नियंत्रण ठेवण्याचं आणि सर्व नियमांचं पालन करण्याची जबाबदारी आहे. यात काही अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे काम केलं आहे. यात लॉकडाऊनचं पालन करताना प्रवासी मजुरांना, गरीबांना जेवणही पोहोचवलं आहे. भारतात मेघालयातल्या ईस्ट गारो हिल्सचे जिल्हाधिकारी असेलेल्या स्वप्निल यांनी लॉकडाऊनमध्ये प्रशासनाचे कामकाज चोख पार पाडताना नागरिकांचीही काळजी घेतली.

स्वप्निल यांनी त्यांच्या जिल्ह्यात एकही गरीब व्यक्ती किंवा मजूर उपाशी झोपणार नाही याची काळजी घेतली. आतापर्यंत मेघालयात 13 कोरोना रुग्ण सापडले असून यातील 11 जण तंदुरुस्त झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. शिलाँगमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले 6 जण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यात खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळले तोपर्यंत बाहेरील राज्यातून 200 जण परतले होते. यात परदेशातून कोणीही आलं नव्हतं. त्या सर्वांना होम क्वारंटाइन करून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आलं. आता जिल्ह्यात एकही संशयास्पद अशी व्यक्ती नाही की ज्याची टेस्ट झाली नाही अशी माहिती स्वप्निल टेंबे यांनी दिली.

हे वाचा : चालून चालून थकलेल्या मजुरांचा सुटला धीर, दोघांचा वाटेत मृत्यू तर एकाची नदीत उडी

जिल्हाधिकाऱ्यांसमोर सर्वात मोठं चॅलेंज होतं ते मजुरांना अन्न पुरवण्याचं. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील बीपीएल कार्ड धारकांना एप्रिल, मे महिन्यात रेशन मोफत देण्यात आलं. जून महिन्यातसुद्धा एक किलो डाळ आणि 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना सुरू राहील. यासह जवळपास 90 टक्के ग्रामीण लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचवलं जात असल्याचंही स्वप्निल यांनी सांगितलं.

हे वाचा : कोरोना व्हायरसवर वॅक्सिनला लोकांचा विरोध का? सेलिब्रिटीं केलंय समर्थन

राज्यात आसाममधून आलेले मजुरही राहतात ज्यांच्याकडे रेशन कार्ड नसल्यानं अन्नधान्य देणं कठीण आहे. मात्र त्यांनी जिल्हा सहाय्यता निधीअंतर्गत मदत कऱण्यात आली. यासाठी सेल्फ हेल्प ग्रुप्सची मदत घेतली. स्वप्निल यांनी सांगितलं की, त्यांना एका दिव्यांग व्यक्तीचा फोन आला ज्यात सांगण्यात आलं की मोबाईल रिपेअरिंगचं दुकान लॉकडाऊनमुळे बंद झालं. यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यानंतर जिल्ह्यामध्ये अशा मदतीची गरज असलेल्या लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि त्यांना मदत पोहोचवली.

हे वाचा : Lockdown मुळे गेली नोकरी, फळे आणि भाजीपाला विकून उदरनिर्वाह करतोय ग्रॅज्युएट

First published: May 15, 2020, 9:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading