भाजी आणण्यासाठी 10 किमी चालतात हे IAS अधिकारी! फोटो झाले व्हायरल

रामसिंह यांच्यापासून प्रेरणा घेऊन आणखीही अधिकाऱ्यांनी हा चालण्याचा व्यायाम सुरू केला आहे. जर कमी अंतर असेल तर पायी जा, हा सल्ला मी अनेकांना देतो, असं राम सिंह सांगतात.

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2019 09:02 PM IST

भाजी आणण्यासाठी 10 किमी चालतात हे IAS अधिकारी! फोटो झाले व्हायरल

शिलाँग, 25 सप्टेंबर : सोशल मीडियावर एका IAS अधिकाऱ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या IAS अधिकाऱ्याचं नाव आहे, रामसिंह. रामसिंह हे मेघालयातल्या गारो हिल्समध्ये डेप्युटी कमिशनर आहेत. त्यांनी फेसबुकवर लिहिलं आहे की ते वीकेंडला 21 किलो भाजी घेऊन तब्बल 10 किलोमीटर चालत जातात.

त्यांचा हा फिटनेस फंडा आहे. हिमाचल प्रदेशचे राहणारे रामसिंह सांगतात, गेले 6 महिने ते अशा पद्धतीने व्यायाम करतात. बांबूच्या टोपलीतून भाजी आणली तर ते पर्यावरणपूरक आहे.ट्रॅफिक आणि प्लॅस्टिक या दोन्ही समस्यांवर हा चांगला उपाय आहे.

रामसिंह यांच्यापासून प्रेरणा घेऊन आणखीही अधिकाऱ्यांनी हा चालण्याचा व्यायाम सुरू केला आहे. जर कमी अंतर असेल तर पायी जा, हा सल्ला मी अनेकांना देतो, असं राम सिंह सांगतात.

आठवडा बाजारात सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली भाजी मिळते. भाजी विकणारे दूरच्या अंतरावरून भाजी आणतात. जर ते इतक्या दुरून भाजी आणत असतील तर आपण भाजी घेऊन चालत तर नक्कीच जाऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे.रामसिंह सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असतात. त्यांच्या पोस्ट्समध्येही त्यांनी त्यांच्या पायी चालण्याच्या सवयीबद्दल लिहिलं आहे.

(हेही वाचा : PMC बँकेच्या कारवाईनंतर या 9 बँका बंद होणार का? RBI ने केला खुलासा)

Loading...

===================================================================================

VIDEO : शरद पवार Uncut प्रेस कॉन्फरन्स; म्हणाले, 27 तारखेला मीच ED ऑफिसला जाणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 09:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...