काश्मीरींवर बंदी घाला, राज्यपाल रॉय यांचं धक्कादायक ट्वीट

काश्मीरींवर बंदी घाला, राज्यपाल रॉय यांचं धक्कादायक ट्वीट

पुलवामा हल्ल्यानंतर मेघालयाच्या राज्यपालांनी केलेल्या ट्विटवरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

दिल्ली, 19 फेब्रुवारी : 'काश्मीरींवर बंदी घाला. काश्मीरमधून येणाऱ्या प्रत्येक वस्तूंवर बहिष्कार घाला,' असं वादग्रस्त ट्वीट मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांनी केलं आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांनी केलेल्या ट्विटवरून आता वाद निर्माण झाला आहे. या ट्वीटवर रॉय यांनी ठाम असल्याचं देखील म्हटलं आहे. शिवाय, या ट्वीटमध्ये रॉय यांनी काश्मीरला भेट देऊ नका. पुढील दोन वर्षासाठी अमरनाथ यात्रेला जाऊ नका. शिवाय, काश्मीरी लोक किंवा काश्मीरच्या लोकांकडून कोणतीही वस्तू खरेदी करू नका असं म्हटलं आहे. या ट्वूटनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.

">

पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर देशात संतापाची लाट आहे. पण, एका राज्याच्या राज्यपालनं असं ट्वीट केल्यानं मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पुलवामात भ्याड हल्ला

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी IED द्वारे आत्मघातकी हल्ला केला. हल्लाजैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

काश्मीरींविरोधात संताप

दरम्यान, पुलवामातील हल्ल्यानंतर काश्मीरींविरोधात देखील संताप पाहायाला मिळत आहे. देहराडून येथे काश्मीरी विद्यार्थ्यांविरोधात जोरदार निदर्शनं केली जात आहेत. शिवाय, काही संघटनांच्या दबावामुळे खासगी कॉलेजनं डीनला देखील निलंबित केलं आहे. देशभरात देखील सध्या पुलवामा हल्ल्याचा जोरदार निषेध केला जात आहे.

First published: February 19, 2019, 3:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading