भारताला इस्लामी देश बनवण्याचा प्रयत्न कराल तर... : हायकोर्टाचं मोठं स्टेटमेंट

भारताला इस्लामी देश बनवण्याचा प्रयत्न कराल तर... : हायकोर्टाचं मोठं स्टेटमेंट

हिंदूंना देशाचं नागरिकत्व कुठल्याही कागदपत्रांशिवाय मिळावं, मेघालय हायकोर्टानं आज हे एक मोठं खळबळजनक स्टेटमेंट दिलंय.

  • Share this:

हिंदूंना देशाचं नागरिकत्व कुठल्याही कागदपत्रांशिवाय मिळावं, मेघालय हायकोर्टानं आज हे एक मोठं खळबळजनक स्टेटमेंट दिलंय. भारताला आणखी एक इस्लामी देश बनवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. नाहीतर ती देशाच्या आणि जगाच्या अंताकडे नेणारी गोष्ट ठरेल, असं सांगत मेघालयाच्या उच्च न्यायलयाने एक विशेष आवाहनही केलं आहे.

पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश इथून येणाऱ्या हिंदूंना आणि शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन धर्मीयांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय आणि कुठलीही शंका न घेता भारताचं नागरिकत्व मिळायला हवं. त्यासाठीचा कायदा करण्याचं आवाहन मेघालय हायकोर्टाने आज पंतप्रधान, कायदा मंत्री आणि संसदेला केलं आहे.

एस. आर. सेन या न्यायमूर्तींनी दिलेल्या 37 पानांच्या निकालपत्रात वरील निवेदन केलंय. अमोन राणा नावाच्या इसमानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना न्या. सेन यांनी परदेशात हिंदू आणि मुस्लीमेतरांवर अत्याचार होतात, असं निरीक्षण नोंदवलं. अमोन सेन यांना डोमिसिल सर्टिफिकेट (रहिवासी असल्याचा दाखला) नाकारल्याच्या विरोधात त्यांनी मेघालय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आसाममध्ये गाजलेल्या NRC प्रकरणासंदर्भातलीच (नागरिकत्व परीक्षेतली) ही एक याचिका आहे.

हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी, खाँसी, जैंतिया आणि गारो धर्मीयांना आपल्या शेजारी देशांत आजही छळवणुकीचा सामना करावा लागतो आणि त्यांना भारताशिवाय इतर कुठेही जागा नाही, असं निरीक्षण या हायकोर्टानं नोंदवलंय.

धर्माच्या जोरावर भारत पाकिस्तानात फाळणी झाली, तेव्हा तिथल्या हिंदू धर्मीयांचा नीट विचार झाला नाही, असंही निरीक्षण त्यांनी नोंदवलं.

First published: December 12, 2018, 10:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading