मराठी बातम्या /बातम्या /देश /महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार संजय राऊतांना भेटलो, नवनीत राणांचा लडाख भेटीवर खुलासा

महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार संजय राऊतांना भेटलो, नवनीत राणांचा लडाख भेटीवर खुलासा

'मी जेव्हा लडाखला गेले, तेव्हा कळलं ही संजय राऊत सुद्धा तिथे आहे. ते तिथे आहे म्हणून मी गेले नसते तर...

'मी जेव्हा लडाखला गेले, तेव्हा कळलं ही संजय राऊत सुद्धा तिथे आहे. ते तिथे आहे म्हणून मी गेले नसते तर...

'मी जेव्हा लडाखला गेले, तेव्हा कळलं ही संजय राऊत सुद्धा तिथे आहे. ते तिथे आहे म्हणून मी गेले नसते तर...

नवी दिल्ली, २० मे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या प्रकरणावरून खासदार नवनीत राणा आणि शिवसेनेमध्ये कमालीचा वाद पाहण्यास मिळाला होता. पण, हा वाद शमत नाही तेच राणा दाम्पत्य आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) हे लडाखमध्ये (Ladakh visit) एकत्र पाहण्यास मिळाले, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांंना तोंड फुटले आहे. मात्र, महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार संजय राऊत यांची भेट घेतली, असा खुलासा नवनीत राणा (navneet rana) यांनी केला. तसंच, जेलमध्ये मी जे भोगलं त्यांना काय माहिती, असंही नवनीत राणा म्हणाल्या.

खासदार नवनीत राणा यांनी न्यूज१८ लोकमतशी बोलत असताना संजय राऊत यांची लेह-लडाखमध्ये झालेल्या भेटीबद्दल खुलासा केला आहे.

'मी जेव्हा लडाखला गेले, तेव्हा कळलं ही संजय राऊत सुद्धा तिथे आहे. ते तिथे आहे म्हणून मी गेले नसते तर माझ्या कामावर अन्याय झाला असता, म्हणून मी त्यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार मी संजय राऊत यांच्या सोबत लेहमध्ये वागले, त्यांना जरी महाराष्ट्राची संस्कृती माहीत नसेल पण मला माहित आहे. 14 दिवस मी तुरुंगात होते, तो त्रास मी भोगला आहे. संजय राऊत यांना काय माहित आहे,असं नवनीत राणा म्हणाल्या.

तसंच, माझी लढाई अजूनही सुरू आहे, माझ्यासोबत जो काही प्रकार घडला त्याबद्दल मी २३ तारखेला संसदेच्या समितीसमोर माझी बाजू मांडणार आहे. जे माझ्याविरोधात बोलले, त्या सर्वांसमोर मी साक्ष देणार आहे, मी यामध्ये झुकणार नाही, असंही नवनीत राणा यांनी सांगितलं.

लडाखमध्ये कशी झाली भेट?

संसदीय समितीच्या संरक्षण समितीचे सदस्य सध्या लडाख दौऱ्यावर होते. या दौऱ्यात एकूण 30 खासदारांचा समावेश असून त्यात खासदार संजय राऊत आणि खासदार नवनीत राणा यांचा समावेश होता. खासदाराला आपल्यासोबत कुटुंबातील एका व्यक्तीला सोबत घेण्याची परवानगी होती आणि त्यामुळेच नवनीत राणा यांच्यासोबत आमदार रवी राणा हे लडाख दौऱ्यात सुद्धा उपस्थित होते. यावेळी एकमेकांवर टीका करणारे संजय राऊत आणि नवनीत राणा हे एकत्र दिसून आले. आमदार रवी राणा आणि संजय राऊत हे एकमेकांसोबत जेवण करतानाही दिसून आलं आहे. त्यासंदर्भातील फोटोजही व्हायरल झाले आहेत.

First published:
top videos