Home /News /national /

तुटपुंज्या सामानासह इंडिगो विमानात कशी केली प्रसूती? डॉ. शैलजा यांनी सांगितला अंगावर रोमांच उभा करणारा अनुभव

तुटपुंज्या सामानासह इंडिगो विमानात कशी केली प्रसूती? डॉ. शैलजा यांनी सांगितला अंगावर रोमांच उभा करणारा अनुभव

डॉ. शैलजा बेंगळुरूतील लोटस डायग्नॉस्टिक सेंटर अँड क्लाउडनाइन हॉस्पिटलमध्ये सल्लागार म्हणून काम करतात.

    मुंबई, 09 ऑक्टोबर : इंडिगो विमानात एका महिलेनं अर्भकाला जन्म दिला मात्र हे शक्य झालं ते केवळ डॉ. शैलजा यांच्यामुळे. डॉ. शैलजा कोण आहेत आणि त्यांनी तुटपुंज सामानातील विमानात कशी केली महिलेची प्रसूती याचा अंगवर रोमांचं उभे करणारा अनुभव शेअर केला आहे. ‘मला अंदाज आला होता की ती आता प्रसूत होणार. मी स्वत: ला सॅनिटाइझ केलं, हातमोजे आणि पीपीई किट घातलं आणि प्रसूतीची प्रक्रिया सुरू केली. मोनिका टॉयलेट सीटवर बसली होती आणि तिनी बाळाला बाहेर ढकलायला सुरुवात केली. बाळाचं डोकं बाहेर आलं मग मी तिच्या पोटावर जोर दिला काही क्षणांतच बाळाचा जन्म झाला. 1.82 किलो वजनाचा एक प्री मॅच्युअर मुलगा जन्मला,’ स्रीरोगतज्ज्ञ डॉ. शैलजा त्यांचा अनुभव सांगत होत्या. गुरुवारी इंडिगो 6E 122 दिल्ली-बेंगळुरू या विमानाने दिल्लीतून उड्डाण केलं. सगळं सुरळीत होतं. 15 मिनिटांनी मोनिका या 30 वर्षांच्या गरोदर महिलेच्या पोटात दुखू लागलं. विमानात असलेल्या डॉ. नागार्जुन यांनी तिला तपासलं आणि अपचन व असिडिटी झाली असावी असं निदान केलं. पण मोनिकाचं दुखणं वाढलं ती अस्वस्थ झाली आणि रेस्ट रूमकडे चालत गेली. त्यावेळी स्रीरोगतज्ज्ञ डॉ. शैलजा व्ही. यांच्या लक्षात आलं की मोनिकाला रक्तस्राव होत आहे. त्यांना ताबडतोब क्रू मेंबरला याबद्दल माहिती दिली आणि त्या रेस्टरूमकडे धावल्या. मोनिकानी शैलजा यांना सांगितलं की ती दीड महिन्यांची प्रेग्नंट आहे पण डॉ. शैलजा यांना तिला तपासल्यावर लक्षात आलं की ती किमान 32 आठवड्यांची प्रेग्नंट आहे आणि आता तिला प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या होत्या. त्यामुळे त्यांनी केबिन क्रू आणि डॉ. नागराज यांच्या मदतीने विमानाच्या रेस्टरूममध्येच मोनाकीची प्रसूती केली. संध्याकाळी 6.10 मिनिटांनी बाळाचा सुखरूप जन्म झाला. प्री-मॅच्युअर बाळ असल्यामुळे बेंगळुरूला पोहोचेपर्यंत त्याची काळजी घेणं गरजेचं होतं. त्यामुळे डॉ. शैलजा यांनी प्रवाशांकडून डायपर आणि शाली मागवल्या. मोनिकाचा रक्तस्राव थांबत नव्हता म्हणून तीन सीटच्या बेंचवर बॅग ठेऊन उंच बेड तयार करण्यात आला. आईच्या सहवासात तिच्या त्वचेला चिकटून बाळ राहिलं तर ते सुरक्षित असतं या पारंपरिक ज्ञानाचा वापर डॉ. शैलजांनी केला आणि कांगारू मेथडचा वापर करून आई आणि बाळाला एका शालीत लपेटून त्यांच्यासाठी उब निर्माण केली. विमान बेंगळुरूत उतरलं आणि शेवटी आई-बाळ सुखरूप जमिनीवर उतरलं. डॉ. शैलजा बेंगळुरूतील लोटस डायग्नॉस्टिक सेंटर अँड क्लाउडनाइन हॉस्पिटलमध्ये सल्लागार म्हणून काम करतात. त्या म्हणाल्या, ‘माझ्या 10 वर्षांच्या करिअरमध्ये मला पहिल्यांदाच अशाप्रकारे चालू विमानात हवेतच डिलिव्हरी करावी लागली. मला असं करता आलं याबद्दल मी स्वत: ला नशीबवान समजते. इंडिगो विमानातील क्रूने, डॉ. नागराज आणि सहकारी प्रवाशांनीही मदत केल्यामुळे ते शक्य झालं. पण एक गोष्ट लक्षात आली की सर्व विमानांमध्ये प्रसूतीसाठी आवश्यक प्राथमिक साहित्य उपलब्ध असायला हवं. तसंच केबिन क्रूला अशी आणीबाणीच्या प्रसंगात मदत करता यावी यासाठी थोडं प्रशिक्षणही द्यायला हवं. ’असं शैलजा यांना सांगितलं तर आई-बाळ दोघंही सुखरुप असल्याची माहिती त्यांनी दिली.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या