भारतीय निवडणुकांच्या इतिहासात या उमेदवाराच्या नावावर आहे अनोखा विक्रम

अमूक नेता इतक्या वेळा जिंकला, विजयाची हॅटट्रिक, कधीही न हरलेला नेता अशा अनेक राजकीय यशोगाधा आपण आतापर्यंत ऐकल्या असतील. पण हा एक उमेदवार भारतीय गाजला तो सर्वांत अपयशी उमेदवार म्हणून.

News18 Lokmat | Updated On: Mar 28, 2019 06:23 PM IST

भारतीय निवडणुकांच्या इतिहासात या उमेदवाराच्या नावावर आहे अनोखा विक्रम

मुंबई, 28 मार्च : अमूक नेता इतक्या वेळा जिंकला, विजयाची हॅटट्रिक, कधीही न हरलेला नेता अशा अनेक राजकीय यशोगाधा आपण आतापर्यंत ऐकल्या असतील. पण एक उमेदवार भारतीय निवडणुकीच्या इतिहासात गाजला तो सर्वात अपयशी उमेदवार म्हणून. सर्वाधिक वेळा निवडणूक हरण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तामिळनाडूतील या उमेदवाराचं नाव आहे - डॉ. के पद्मराजन. 'ऑल इंडिया इलेक्शन किंग' असं बिरूद त्यांनी स्वतःच लावून घेतलं आहे.

डॉ.पद्मराजन यांना छंद असल्यासारखे ते निवडणुकीला उभे राहतात आणि सपाटून आपटतात. पुन्हा पुढच्या निवडणुकीची घोषणा झाली की कंबर कसून या लोकशाहीच्या यज्ञात उभे राहतात. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली 1988 पासून. त्यांनी अनेक दिग्गजांविरोधात उभं राहून अपयश पत्करलं आहे. आतापर्यंत 170 निवडणुका ते लढले आणि त्यातली एकही जिंकलेली नाही.

तामिळनाडूत सालेम जिल्ह्यातले रहिवासी असलेले पद्मनाभन होमिओपॅथी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. नंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. 1988 पासून ते निवडणुकांना उभे राहात आहेत.  यांनी तिथल्या अनेक स्थानिक निवडणुका तर लढल्या आहेतच. पण ते केवळ स्थानिक निवडणूक लढवणारे उमेदवार नाहीत. त्यांनी अनेक राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना शह देण्याच्या इच्छेने उमेदवारी दाखल केली होती. इतकंच काय अगदी पंतप्रधानपदी नाव घेतलं जातंय अशा उमेदवाराविरोधातही पद्मराजन उभे राहिल्याचा इतिहास आहे.

या बड्या नेत्यांविरोधात लढले आणि हरले

अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, प्रणब मुखर्जी, ए पी जे अब्दुल कलाम, जयललिता, एम. करुणानिधी या बड्या नेत्यांविरोधात पद्मराजन यांनी लढत दिली आहे. अर्थातच या नेत्यांपुढे त्यांचा टिकाव लागलेला नाही. ऑल इंडिया इलेक्शन किंग असं ते स्वतःला म्हणवून घेतात.

Loading...

पद्मराजन यांनी आतापर्यंत 28 लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रपती पदाची निवडणूकही ते लढले आहेत. एकदा नव्हे तर 8 वेळा. 11 मुख्यमंत्र्यांविरोधात त्यांनी निवडणुका लढवल्या आणि हरले.

----


VIDEO : तरुणाच्या हत्येची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2019 06:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...