मेरठ, 12 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशच्या मेरठमधील एका कुटुंबाला घराच्या छतावर नोटा आणि दागिन्यांनी भरलेल्या दोन बॅग सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुळात ही नशिबाची देण नाही तर चोरानं केले उपद्व्याप आहेत. दोन दिवसांपूर्वी मेरठच्या मिशन कॉन्फरन्स क्षेत्रात 40 लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. बॅग मिळाल्यानंतर कुटुंबियांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली.
सदर पोलीस स्टेशनचे प्रभारी दिनेश बघेल म्हणाले, “बॅगेत दागिन्यांव्यतिरिक्त 14 लाखांची रोकड होती. दागिन्यांचे मूल्यांकन करणे बाकी आहे. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणी एक व्यावसायिक पवन सिंहल यांनी चोरीची तक्रार दाखल केली होती. दुसर्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी सिंघलचे शेजारी वरुण शर्मा यांच्या घरी बॅग सापडली. कुटुंबियांनी सांगितले की, बॅग पाहून त्यांना कळले की हे चोरीचे प्रकरण आहे. त्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांत तक्रार केली.
वाचा-बिबट्याच्या जबड्यातून भाचीला वाचवण्यासाठी मामानं केलं जीवाचं रान, नाशिकमधील थरार
चोरांने शेजारच्यांच्या घरातच ठेवली बॅग
कुटुंबियांनी सांगितले की, "कदाचित परत येण्याच्या उद्देशानं चोरानं आमच्या घराच्या छतावर बॅग सोडली असेल." पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयाची सुई दोन वर्षापूर्वीपर्यंत व्यावसायिकाच्या घरी नोकरी करणारी आणि त्यानंतर काम सोडणार्या राजू नेपाळीवर आहे. बऱ्याच कालावधीनंतर गायब झाल्यानंतर नेपाळी परत आला होता.
वाचा-दैव बलवत्तर! अंधारात ट्रॅकवर फिरत होते हत्ती, मागून सुसाट ट्रेन आली पण...
घरातील नोकरणार संशय
घरातील सगळे पुरुष दुकानात होते तर महिला खरेदीसाठी बाहेर गेले होते. नेपाळी घरातल्या सदस्यांशी चांगला परिचित होता म्हणून पहारेकऱ्यांनी त्यालाही रोखले नाही. घरातून मौल्यवान वस्तू चोरून नेपाळी तेथून पळून गेला. घरातील सीसीटीव्हीमध्ये त्याला कैद करण्यात आले. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.