शहिदांच्या नातेवाईकांना 1 कोटी रुपये देणार, राजनाथ सिंहांची घोषणा

शहिदांच्या नातेवाईकांना 1 कोटी रुपये देणार, राजनाथ सिंहांची घोषणा

केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना वर्दीच्या ऐवजी प्रतिवर्षी 10,000 रुपये रोख देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

  • Share this:

07 आॅक्टोबर : शहीद जवानांच्या नातेवाईकांना मदत म्हणून 1 कोटींची मदत देणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. मेरठमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्सची स्थापना करण्यात आलीये. या कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनीही घोषणा केली.

राजनाथ सिंह यांच्या हस्ते 25 व्या स्थापना दिवसाच्या परेडची सलामी घेतली. या कार्यक्रमात आरएएफच्या 5 नव्या बटालियन स्थापन करण्यात येईल. जानेवारी 2018 पासून स्थापन करण्याच्या कामाला सुरुवात होईल अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत देशाची सीमारेषा आणि विविध ठिकाणी सीमा सुरक्षा दल आणि रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान अहोरात्र पहारा देत असतात. देशाची आर्थिक प्रगती जेव्हाच होईल जेव्हा सांप्रदायिकता, जातीयवाद आणइ अराजकता संपुष्टात येईल असं मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं. त्यांनी रॅपिड अॅक्शन फोर्सच्या 5 नव्या बटालियनची घोषणाही केली. ही नवी बटालियन जानेवारी 2017 पासून कार्यरित होईल.

जवानांना वर्दीच्या ऐवजी 10 हजारांची मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2022 पर्यंत नव्या भारताचा संकल्प केला आहे. देशाची सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जवानांना आपला जीव गमवावा लागतोय, यासाठी आता सरकार केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना वर्दीच्या ऐवजी प्रतिवर्षी 10,000 रुपये रोख देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2017 10:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading