2500 रुपयांत मिळवा कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट! रुग्णालयाच्या धक्कादायक ऑफरमुळे खळबळ

2500 रुपयांत मिळवा कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट! रुग्णालयाच्या धक्कादायक ऑफरमुळे खळबळ

एकीकडे जास्तीत जास्त कोरोना चाचणीवरही भर दिली जात आहे. मात्र अशातच एक रुग्णालयानं अजब ऑफर सुरू केली आहे.

  • Share this:

मेरळ, 06 जुलै : देशात कोरोनानं थैमान घातले आहे. रशियाला मागे टाकत आता जगातील आकडेवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. दुसरीकडे जास्तीत जास्त कोरोना चाचणीवरही भर दिली जात आहे. मात्र अशातच एक रुग्णालयानं अजब ऑफर सुरू केली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका खासगी रुग्णालयानं 2500 रुपयांत कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट देण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सत्य समोर आले.

व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये रुग्णालयातील कर्मचारी 2500 रुपये द्या आणि कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट मिळवा, असे सांगताना दिसत आहेत. एवढेच नाही तर या रिपोर्टवर सरकारी रुग्णालयाचा शिक्काही देण्यात येणार असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. सध्या या खाजगी रुग्णालयातविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, कोणाला असे रिपोर्ट देण्यात आलेत का? याची चौकशी केली जात आहे. सध्या या रुग्णालयाला टाळं ठोकण्यात आलं आहे.

वाचा-आता 'या' राज्यात तब्बल 1 वर्ष पाळावे लागणार कोरोनाचे नियम

मेरठचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राजकुमार सैनी यांनी व्हिडीओ झाल्यानंतर कारवाईचे आदेश दिले. हे रुग्णालय शाह आलम नावाच्या इसमाच्या मालकीचे असून, त्यांनी हा व्हिडीओ खोटा असल्याचे म्हटले आहे. शाह आलम यांनी आपल्या रुग्णालयाची बदनामी करण्यासाठी हा व्हिडीओ तयार केला असल्याचे सांगितले. मेरठमध्ये आतापर्यंत 1116 करोना पॉझिटिव्ह रुग्ण असून 69 जणांचा मृत्यू झाला आहे.

वाचा-कोरोनानंतर आता 'या' भयंकर आजाराचे संकट, चीनमध्ये हाय अलर्ट जारी

रशियापेक्षा जास्त कोरोनाबाधितांचा आकडा

देशात सध्या कोरोनाचे 6 लाख 87 हजार 760 कोरोना रुग्ण आहेत. यासह रशियाला मागे टाकत भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. रशियामध्ये कोरोनाचे 6 लाख 81 हजार 251 रुग्ण आहेत. कोरोनाच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेत 29 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत तब्बल 17 हजार 244 नवीन प्रकरणं समोर आली. अमेरिकेत कोरोनामुळं 1 लाख 32 हजार 382 लोकांचा मृत्यू झाला.

वाचा-कोरोनाला रोखण्यासाठी या त्रिसूत्रीचा अवलंब करा, मंत्र्यांनी दिल्या सूचना

संकलन-प्रियांका गावडे.

First published: July 6, 2020, 9:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading