नात्याला काळिमा! आई- बहिणीसोबत अश्लिल चाळे करायचा मुलगा, जन्मदात्रीनेच दिली सुपारी!

नात्याला काळिमा! आई- बहिणीसोबत अश्लिल चाळे करायचा मुलगा, जन्मदात्रीनेच दिली सुपारी!

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये आई- मुलगा आणि बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

  • Share this:

मेरठ, 12 जुलै: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये आई- मुलगा आणि बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. या कृत्याला कंटाळून अखेर आईनेच 50 हजार रुपयांत सुपारी देऊन पोटच्या मुलाची हत्या घडवून आणली.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आई आणि दोन सुपारी किलरला अटक केली आहे. अवघ्या सहा तासांत या प्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. मृत तरुण जन्मदात्री आई आणि बहिणीसोबत अश्लिल चाळे करत होता. मेरठमध्ये या घटनेने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा... खळबळजनक! आत्मा मालिक ध्यानपीठ वसाहतीत 24 वर्षीय तरुणीची आत्महत्या

दररोजच्या अत्याचाराला कंटाळून आईनेच उचललं पाऊल...

लिसाडी गेट परिसरात हे हत्याकांड घडलं आहे. परवेज (वय-22) असं हत्या झालेल्या नराधमाचं नाव आहे. बुधवारी (8 जुलै) रात्री उशिरा दोन गुंडांनी टेरेसवर झोपलेल्या परवेजला गोळ्या घालून त्याची हत्या केली होती. नंतर दोन्ही मारेकरी पसार झाले, असा बनाव आईनं पोलिसांसमोर केला होता. मात्र, पोलिस चौकशीत परवेजची आई आणि बहिणीच्या जबाबात विरोधाभास दिसून आला. त्यामुळं पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी परवेजच्या आईला ताब्यात घेतलं. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सहा तासांनंतर तिनं धक्कादायक माहिती दिली. त्यामुळे परवेजची हत्या तिनंच सुपारी देऊन घडवून आणल्याचं कबूल केलं. पोटच्या नराधम मुलाला ठार मारण्याची तिनं गुंडांना 50 हजार रुपये दिले होते. मुलगा दररोज अश्लिल चाळे करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलल्याची कबुली आरोपी आईनं दिली आहे.

हेही वाचा...विकास दुबेच्या 2 साथीदारांना मुंबईत अटक, धक्कादायक माहिती समोर

पिस्तुलाचा धाक दाखवून करायचा अत्याचार..

आरोपी आईनं पोलिसांना सांगितलं की, परवेज गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून अत्याचार करत होता. त्यानं त्याच्या लहान बहिणीलाही सोडलं नव्हतं. तो बहिणीकडेही वाईट नजरेनं पाहायचा. त्याला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बदलायला तयार नव्हता. त्यामुळे अखेर गुंडांना पैसे देऊन त्याची हत्या घडवून आणली.

Published by: Sandip Parolekar
First published: July 12, 2020, 6:43 PM IST

ताज्या बातम्या