धागा बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग; अनेक मजूर जखमी, लाखोंचं नुकसान

धागा बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग; अनेक मजूर जखमी, लाखोंचं नुकसान

धाग्याने आग पकडल्याने, आग मोठ्या प्रमाणात पसरली. या दुर्घटनेवेळी कारखान्यात काही मजूर काम करत होते. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून, काही मजूर, मशीनही आगीच्या विळख्यात आल्याची माहिती मिळत आहे.

  • Share this:

मेरठ, 11 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातील मेरठ (Meerut)  जिल्ह्यात एका धागा बनवणाऱ्या कारखान्यात (Textile Factory)  मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश आलं. या अग्नितांडवात (Massive Fire)  लाखोंचं नुकसान झालं असल्याची शक्यता आहे. या आगीत काही मजूरही गंभीररित्या जखमी झाले आहेत.

औद्योगिक क्षेत्रात असलेल्या अजय गर्ग यांच्या शिव शक्ति टेक्सटाईल कारखान्यात धागा तयार केला जातो. जवळपास रात्री 12 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे कारखान्यात मोठी आग लागली. धाग्याने आग पकडल्याने, आग मोठ्या प्रमाणात पसरली. या दुर्घटनेवेळी कारखान्यात काही मजूर काम करत होते. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून, काही मजूर, मशीनही आगीच्या विळख्यात आल्याची माहिती मिळत आहे. आगीत लाखोंच्या नुकसानीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कारखान्यात आग विझवण्यासाठी पाण्याची सोय नसल्याने, अग्निशमन दलाला सुरुवातीला समस्या आल्या. मात्र तीन अग्निशमन दलाच्या गाड्यांनी रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचं यश मिळवलं आहे.

कानपूरमध्ये ऑईल फॅक्ट्रीत आग -

कानपूरमध्ये इंडस्ट्रियल भागात, रात्री 3 वाजता बंद पडलेल्या रिफायनरी कारखान्यात आगी लागली. आगीने रौद्र रुप धारण केल्याने, संपूर्ण कारखान्यात आगडोंब पसरला होता.

Published by: Karishma Bhurke
First published: November 11, 2020, 11:39 AM IST
Tags: fire

ताज्या बातम्या