News18 Lokmat

मित्राच्या पत्नीला तरुणाने नेलं पळवून, चिडवण्यासाठी पाठवला किस करतानाचा व्हिडिओ!

आरोपी नवीन हा विवाहित असून त्याला दोन मुलं आहे. तर त्याच्यासोबत पळून जाणाऱ्या महिलेला सुद्धा दोन मुली आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 31, 2018 09:41 PM IST

मित्राच्या पत्नीला तरुणाने नेलं पळवून, चिडवण्यासाठी पाठवला किस करतानाचा व्हिडिओ!

उत्तरप्रदेश, 31 डिसेंबर : बागपत इथं एका तरुणानं आपल्याच मित्राची बायको पळवून नेली. तो एवढ्यावरच थांबला नाहीतर त्यानं त्याच्या पत्नीसोबत एक व्हिडिओ रेकाॅर्ड करून पाठवला होता. या व्हिडिओमध्ये महिलेनं आरोपीसोबत राहणार असल्याचं सांगितलं. आरोपी तरूण हा सुद्धा विवाहित आहे. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.

घडलेली हकीकत अशी की, बागपत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावातील ही घटना आहे. नवीन चौधरी नावाचा तरूण हा आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीला घेऊन पळून गेला होता. दोघेही सोबत राहत होते. महिला आणि आरोपी नवीन हे एकमेकांना पती-पत्नी मानत होते. नवीनचं आपल्या शेजाऱ्याच्या घरी नेहमी येणं-जाणं होतं. त्याच दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले होते.

आरोपी नवीन हा विवाहित असून त्याला दोन मुलं आहे. तर त्याच्यासोबत पळून जाणाऱ्या महिलेला सुद्धा दोन मुली आहे. दोघांनी आपल्या प्रेमसंबंधाची कुणालाच खबर लागू दिली नाही. अचानक एकेदिवशी दोघेही पळून गेले. पळून गेल्यानंतर नवीनने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानं आपल्या पत्नीला आणि महिलेनं आपल्या पतीला हा व्हिडिओ पाठवला. हा व्हिडिओ पाहून नवीनच्या पत्नीनं एकच गोंधळ घातला आणि पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.

पोलिसांनी नवीन आणि या महिलेला बोलावून घेतलं. परंतु, नवीनच्या पत्नीनं त्याच्यासोबत परत राहण्यास नकार दिला.

तर नवीनने आपल्या पत्नीला आणि या महिलेलाही सोबत ठेवण्यास तयार झाला. तर पळून जाणाऱ्या महिलेच्या पतीने तिला घरात घेण्यास नकार दिला. या प्रकरणी पोलिसांनी नवीनची रवानगी तुरुंगात केली असून या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Loading...

==============================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 31, 2018 09:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...