कोण आहेत रामजन्मभूमी वादातले मध्यस्थ जस्टिस इब्राहिम खलिफुल्ला ?

कोण आहेत रामजन्मभूमी वादातले मध्यस्थ जस्टिस इब्राहिम खलिफुल्ला ?

राम जन्मभूमीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तीन मध्यस्थांची नेमणूक केली आहे.यामध्ये जस्टिस इब्राहिम कलीफुल्ला, श्री श्री रविशंकर आणि श्रीराम पंचू यांचा समावेश आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 मार्च : राम जन्मभूमीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तीन मध्यस्थांची नेमणूक केली आहे.यामध्ये जस्टिस इब्राहिम खलिफुल्ला, श्री श्री रविशंकर आणि श्रीराम पंचू यांचा समावेश आहे. जस्टिस इब्राहिम खलिफुल्ला यांनी सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून काम केलं आहे. ते जम्मू काश्मीर हायकोर्टामध्ये मुख्य न्यायाधीशही होते. ते आता निवृत्त झाले आहेत पण त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये काम केलं आहे. बीसीसीआयचा कारभार पारदर्शक बनवण्याच्या प्रक्रियेत त्यांनी न्या. लोढांच्या सोबत काम केलं.

ते मूळचे तामिळनाडूमधल्या शिवगंगा जिल्ह्यातल्या कराईकुडीचे. त्यांचा जन्म 23 जुलै 1951 ला झाला. त्यांचं पूर्ण नाव आहे, फकीर मोहम्मद इब्राहीम खलिफुल्ला.

त्यांनी 20 ऑगस्ट 1975 ला वकिली सुरू केली. त्यांनी कामगार कायद्याशी संबंधित खटले लढले आहेत.सार्वजनिक कंपन्यांच्या सोबतच राष्ट्रीयकृत आणि अनुसूचित बँकांचंही त्यांनी प्रतिनिधित्व केलं. तामिळनाडूच्या राज्य विद्युत मंडळाचेही ते वकील होते.या प्रकरणातले दुसरे मध्यस्थ श्री श्री रविशंकर हे आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक आहेत. या संस्थेमार्फत लोकांना आनंदाने जगण्याची कला शिकवली जाते. रविशंकर यांचे भारतात आणि भारताबाहेरही लाखो अनुयायी आहेत.

तब्बल 151 देशांमध्ये 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या शाखा आहेत. याशिवय श्री श्री रविशंकर यांची औषधालयं आणि आरोग्य केंद्रही आहेत.

याआधी राम जन्मभूमीच्या वादावर मध्यस्थांमार्फत तोडगा काढावा, असं कोर्टाने सुचवलं होतं. आता मध्यस्थांची नेमणूकही झाली आहे. या वादावर पुढच्या आठवड्यामध्ये फैजाबादमध्ये तोडगा काढण्यासाठी चर्चा होणार आहे.त्यानंतर एक महिन्यात याबदद्लचा रिपोर्ट सादर होईल.

VIDEO : पंकजांच्या बालेकिल्ल्यात पवारांचा 'मोदी पॅटर्न'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2019 01:05 PM IST

ताज्या बातम्या