'PM मोदींनी विनंती केलीच नाही', ट्रम्प यांचा काश्मीरसंदर्भातील 'तो' दावा भारतानं फेटाळला

'PM मोदींनी विनंती केलीच नाही', ट्रम्प यांचा काश्मीरसंदर्भातील 'तो' दावा भारतानं फेटाळला

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझ्याकडे मदत मागितली होती', असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

  • Share this:

वॉशिंग्टन, 23 जुलै : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझ्याकडे मदत मागितली होती', असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. तसंच हा प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यास आपण तयार असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं. पण परराष्ट्र मंत्रालयानं ट्रम्प यांचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी ट्विटद्वारे ट्रम्प यांच्या दाव्याबाबत आपल्या देशाची भूमिका स्पष्ट केली. 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसार माध्यमांकडे केलेले वक्तव्य आम्ही पाहिलं.  भारत आणि पाकिस्तानने विनंती केल्यास आपण काश्मीर मुद्यावर मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे अशा प्रकारची कोणतीही विनंती केलेली नाही.'

(पाहा :SPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ)

शिवाय, 'भारतानुसार काश्मीर मुद्दा द्विपक्षीय असून त्यात तिसऱ्या पक्षाची भूमिका असू शकत नाही. काश्मीर मुद्यावर पाकिस्तानसोबत केवळ द्विपक्षीय चर्चेतूनच तोडगा काढला जाईल,' हे देखील त्यांनी स्पष्ट केलं. पुढे ते असंही म्हणाले की, 'पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा करण्यापूर्वी  सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया थांबल्या पाहिजेत. तसंच भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून सर्व मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी शिमला करार आणि लाहोर जाहीरनाम्याचा आधार प्रदान करते,' असेही रविश कुमार यांनी स्पष्ट केले.

(पाहा : VIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी)

नेमकं काय आहे प्रकरण?

काश्मीर मुद्यावर भारत आणि पाकिस्तानदरम्यान मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. दोन्ही देशांनी विचारणा केली तर आपण मदतीसाठी तयार आहोत, असे ट्रम्प म्हणाले होते. जानेवारी 2016 मधील पठाणकोट हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी चर्चा केलेली नाही. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे स्पष्टपणे भारतानं पाकिस्तानला ठणकावून सांगितलं आहे.

(पाहा :दोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल)

डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

ट्रम्प यांनी असा दावा केली, 'पंतप्रधान मोदी आणि मी गेल्या महिन्यात झालेल्या जी-20 शिखर संमेलनात काश्मीर मुद्यावर चर्चा केली. जेथे पंतप्रधान मोदींनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थीची विनंती केली होती. पुढे ट्रम्प असंही म्हणाले की, 'मी दोन आठवड्यापूर्वी पंतप्रधान मोदींसोबत होतो आणि यावेळेस आम्ही काश्मीर मुद्यावर चर्चा केली. मोदींनी विचारलं की तुम्ही मध्यस्थी कराल का?... मी विचारले - कुठे ?... तेव्हा मोदी म्हणाले, काश्मीरचा मुद्दा. दरम्यान, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर प्रकरणाचा मुद्दा पुन्हा गाजणार असल्याचं दिसत आहे.

SPECIAL REPORT : अमेरिकेत इम्रान खान यांचं 'मान न मान मैं तेरा मेहमान'!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 10:18 AM IST

ताज्या बातम्या