सोशल मीडियावरून PM मोदींची बदनामी; या राजकीय पक्षाच्या नेत्यास अटक

सोशल मीडियावरून PM  मोदींची बदनामी; या राजकीय पक्षाच्या नेत्यास अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सोशल मीडियावर अपमानजनक पोस्ट केल्यावरून सत्यराज बालू याला अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

चेन्नई, 28 जानेवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सोशल मीडियावर अपमानजनक पोस्ट केल्यावरून मारुमलार्ची द्रवीड मुन्नेत्र कळघम (MDMK) पक्षाचा नेता सत्यराज बालू याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी बालू याला नागपट्टिनम येथून अटक केली. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 504 आणि 502(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

बालू याने पीएम मोदींची बदनामी करणारी पोस्ट शेअर केली होती. या प्रकरणी हिंदू मल्लक काची पार्टी आणि भाजपने तक्रार केल्यानंतर बालू यांना पोलिसांनी अटक केली.

रविवारी PM मोदी तामिळनाडू दौऱ्यावर आले होते. तेव्हा बालूने ही पोस्ट केली होती. मोदीच्या मदुराई येथे सभेच्या आधी बालूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केल्याचे पोलिसांनी सांगितले.

VIDEO : तब्बल 30 वर्षांनंतर त्याच गाण्यावर थिरकले माधुरी आणि अनिल

First published: January 28, 2019, 2:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading