कंपनीतल्या महिलेसोबत शरीरसंबंध, McDonaldच्या CEO ची हकालपट्टी

कंपनीतल्या महिलेसोबत शरीरसंबंध, McDonaldच्या CEO ची हकालपट्टी

McDonald च्या सीईओंनी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्यानं त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

  • Share this:

वॉशिंग्टन, 04 नोव्हेंबर : फास्ट फूड चेन कंपनी मॅकडोनाल्डने त्यांचा सीईओ स्टीव्ह इस्टरब्रुकची हकालपट्टी केली आहे. स्टीव्हने एका महिला कर्मचाऱ्यासोबत शारिरीक संबंध ठेवल्याने त्याला काढून टाकलं आहे. मॅकडोनाल्डने म्हटलं आहे की, स्टीव्हने असं करून कंपनीचे नियम मो़डले आहेत. त्याने महिला कर्मचाऱ्याच्या परवानगीनेच तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले होते असंही कंपनीनं स्पष्ट केलं.

इस्टरब्रुकने 2015 मध्ये सीईओ पदाची सूत्रे सांभाळली होती. मॅकडोनाल्डच्या संचालक मंडळाने स्टीव्हला दोषी ठरवत पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. संचालक मंडळाच्या या निर्णयानंतर स्टीव्हला फक्त सीईओ पदावरूनच नाही तर संचालक मंडळातूनही बाहेर पडावं लागणार आहे. त्याच्यानंतर केंपसिन्सकी यांच्याकडे कंपनीचे सीईओपद दिलं आहे.

कंपनीने त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये स्टीव्ह इस्टरब्रुकचा इमेलसुद्धा शेअर केला आहे. यामध्ये इस्टरब्रुकने आपली चूक मान्य केली आहे. त्याने म्हटलं की, ती एक चूक होती. कंपनीने त्यांचे नियम आणि तत्वे जपली जावीत यासाठी घेतलेला निर्णय मला मान्य आहे. मला आता पुढे जाण्याची गरज आहे.

इस्टरब्रुकने म्हटलं की, कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्यासोबत तिच्या परवानगीने शारिरीक संबंध ठेवले. इथून बाहेर पडल्यानंतर मी आशा करतो की माझ्या खासगी आयुष्याचा आदर केला जाईल. तसेच माझ्या आयुष्यातील मॅकडोनाल्डमधील 4 वर्षे ही व्यावसायिक दृष्ट्या चांगली गेली असंही म्हटलं आहे.

घरात घुसून सोनं लुटणाऱ्या तरुणींना बेदम चोप, धिंडही काढली, नाशिकचा VIDEO व्हायरल

First published: November 4, 2019, 11:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading