बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थ्याची हत्या, परिसरात तणाव!

बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थ्याची हत्या, परिसरात तणाव!

बनारस हिंदू विद्यापीठ परिसरात एका विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

  • Share this:

वाराणसी, 03 एप्रिल: बनारस हिंदू विद्यापीठ परिसरात एका विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण आहे. विद्यापीठ परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

विद्यापीठ परिसरातील बिर्ला हॉस्टेलजवळ मंगळवारी रात्री ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव गौरव सिंह असे आहे. मित्रांसह बिर्ला हॉस्टेलजवळ आलेल्या गौरववर मोटरसायकलवरुन आलेल्या 4 जणांनी गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गौरव गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने विद्यापीठातील ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गौरववर व्यक्तिगत वादातून हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. तो विद्यापीठात एमसीएचे शिक्षण घेत होता.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. याघटनेनंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी ट्रामा सेंटरची तोडफोड केली.

VIDEO : 'नवरा बदलण्याइतकं संविधान बदलणं सोप नाही', स्मृती इराणींबद्दल वादग्रस्त वक्तव्य

First published: April 3, 2019, 9:20 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading